विराट कोहलीनं टीम इंडियाला केलं आवाहन, म्हणाला – ‘जगाला दाखवून देऊ आपली ताकत’

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी भारतात १५ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लागू केले आहे. सगळ्यांना घरात राहून स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवायला सांगितले जात आहे. यादरम्यान काही लोकं अशीही आहेत जे देशाच्या आणि आणि रुग्णांच्या सेवेसाठी दिवसरात्र काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सन्मानासाठी आज ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता नऊ मिनिटे घरातून लाईट आणि दिवे लावायला सांगितले आहेत. मोदींच्या या आवाहनाचे भारताचे क्रिकेटर विराट कोहली, हार्दिक पंड्या ते रेसलर बजरंग पुनिया यांनी समर्थन केले आहे.

खेळाडूंनी समर्थन करण्याचे आवाहन केले
भारताचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट करत म्हटले की, ‘चाहते स्टेडियमची ताकद आहेत, आणि भारताची ताकद त्याची लोकं, आज रात्री ९ वाजता नऊ मिनिटांसाठी. चला जगाला दाखवूया कि आपण एक आहोत. आपल्या हेल्थ वॉरियरना दाखवूया कि आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत. टीम इंडिया.’

तर हार्दिक पंड्यानेही रविवारी सकाळी ट्विट करत म्हटले की, ‘चला देशाच्या योद्धांसाठी दिवे लावू जे आपल्याला या कठीण काळात अंधारातून बाहेर येण्याचा रस्ता दाखवत आहेत. ‘टीम इंडिया’चा सन्मान करू. आमच्या ड्रेसिंग रूमपासून तुमच्या घरापर्यंत लक्ष्मण रेखा आखलेली आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत नरेंद्र मोदीजी.’

त्यांच्याशिवाय संघाचा नंबर एकचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने, “जेव्हा आपण सर्वजण आपल्या फोनचे फ्लॅश लाईट लावून खऱ्या हिरोच्या कामाचे कौतुक करत असू तेव्हा त्याहून वेगळं काहीही होणार नाही. टीम इंडिया हा व्हायरस बाहेर काढूया. आज ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता नऊ मिनिटांसाठी आपला पाठिंबा दर्शवा. त्याचवेळी बॅडमिंटन स्टार सायना नेहवालनेही ट्विट केले की, ती नरेंद्र मोदींच्या मोहिमेत उभी आहे. त्याचवेळी कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट बजरंग पुनियानेही एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

भारतीय रेसलर गीता फोगटनेही ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत लोकांना समर्थनाची मागणी केली. लिहिले की, ‘उद्या रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवा किंवा मेणबत्ती लावून माननीय पंतप्रधान यांना दाखवूया कि पूर्ण भारत त्यांच्यासोबत उभा आहे.’