‘चंद्रयान-3’ ला मोदी सरकारकडून ‘ग्रीन’ सिग्नल, ‘थुथुकुडी’मध्ये बनणार नवं ‘स्पेस पोर्ट’ : ISRO चे प्रमुख के. सिवन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षाच्या मुहूर्तावर इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी २०१९ च्या यशाचे आणि २०२० च्या टार्गेट संदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तामिळनाडूच्या थुथुकुडी येथे नवीन स्पेस पोर्ट तयार केले जाईल. चांद्रयान -२ चे ऑर्बिटर चांगली कामगिरी करत आहे. हे सध्या सात वर्षे काम करत राहील. जगातील जीपीएस प्रणालींना मान्यता देणारी संस्था ३-जीपीपीपी ने आमच्या नेव्हिगेटर पोझिशनिंग सिस्टमला मान्यता दिली आहे. ज्याद्वारे लवकरच देशातील सर्व मोबाईलमध्ये स्वतःची पोझिशनिंग सिस्टम उपलब्ध होईल.

इस्रोचे प्रमुख के. सिवन म्हणाले की, चांद्रयान -३ ला सरकारी परवानगी मिळाली आहे. चांद्रयान -३ अगदी चांद्रयान -३ सारखे असेल. परंतु यावेळी फक्त लँडर-रोव्हर आणि प्रोपल्शन मॉडेल असतील. त्यात ऑर्बिटर पाठविणार नाही, कारण चांद्रयान -२ च्या ऑर्बिटरकडून याला मदत होईल. तसेच २०१९ मध्ये गगनयान प्रकल्पावर बरीच कामे केली गेली आहेत. संपूर्ण २०२० गगनयानसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांच्या प्रशिक्षणात जाईल. अंतराळवीरांना रशियामध्ये प्रशिक्षण दिले जाईल.

तसेच, चांद्रयान -२ चा लँडर जास्त वेग असल्याकारणाने योग्य नेव्हीगेट करू शकला नाही आणि यामुळे हार्ड लँडिंग झाले. दरम्यान, चांद्रयान-२ च्या अपयशामुळे अन्य उपग्रहांच्या प्रक्षेपणात उशीर झाल्याचा चुकीचा आरोप केला जात आहे. असे काहीही नाही. उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी रॉकेट तयार करावे लागतात. जसे आपल्याकडे रॉकेट उपलब्ध असतात आम्ही त्यास लॉन्च करतो. तरी, मार्चपर्यंत आम्ही २०१९ च्या अखेरीस निश्चित करण्यात आलेले सर्व उपग्रह प्रक्षेपित करू.

गगनयान प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्याचा एक भाग म्हणून, यंदा अनमैन्ड (मानवरहित) मिशन करण्याचे नियोजन आहे. जर काम पूर्ण झाले तर तातडीने त्यावर काम करू, अन्यथा पुढील वर्षी या प्रकल्पावर काम करू. कारण या मोहिम अचानक कारण्याइतक्या सोप्या नसतात. त्यांच्यासाठी बरीच तयारी करावी लागेल. अगदी थोड्या प्रमाणात चुकूनही नुकसान होऊ शकते. म्हणून, गगनयान प्रकल्पासाठी सावधपणे काम केले जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/