Indian Stock Market Today | Tata Steel, Reliance, Wipro चे शेअर घसरले, नंतर 52000 अंकाच्या खाली आला Sensex

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Stock Market Today | दोन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजार पुन्हा विक्रीच्या तावडीत सापडला (Indian Stock Market Today). या आठवड्यात बाजारात अनेक दिवसांनंतर तेजी पाहायला मिळाली. विशेषत: खालच्या पातळीवर चांगल्या शेअरच्या खरेदीमुळे बाजाराला सपोर्ट मिळत होता.

मात्र, हा आधार फार काळ टिकला नाही आणि आज त्याला ब्रेक लागला. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE Nifty) ने घसरणीसह व्यवहार सुरू केला. बाजार दिवसभर लाल चिन्हात राहिला आणि शेवटी तोट्यासह बंद झाला.

 

प्री-ओपन पासूनच बाजारात घसरण

प्री-ओपन सेशन (Pre-Open Session) पासूनच देशांतर्गत बाजारात घसरण राहिली. सत्र सुरू होण्यापूर्वी, सेन्सेक्स सुमारे 350 अंकांनी घसरला होता आणि 52,200 अंकांच्या खाली व्यवहार करत होता.

त्याचप्रमाणे प्री-ओपन सेशनमध्ये निफ्टीही जवळपास 100 अंकांनी घसरला होता. सिंगापूरमध्येही एसजीएक्स निफ्टी (SGX Nifty) तोट्यात होता. सकाळी 09:20 वाजता, सेन्सेक्स सुमारे 340 अंकांच्या घसरणीसह 52,192 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी जवळपास 115 अंकांनी घसरून 15,530 अंकांच्या खाली गेला होता. (Indian Stock Market Today)

 

इतका घसरून बंद झाला शेअर बाजार

जसजसा व्यवहार वाढत गेला तसतसा बाजारही खाली गेला. 52,186.36 अंकांवर उघडल्यानंतर, सेन्सेक्स एकदाच 52,272.85 अंकांवर चढू शकला. व्यवहारादरम्यान तो 51,739.98 अंकांच्या नीचांकी पातळीवर आला.

व्यवहार बंद झाल्यानंतर सेन्सेक्स 709.54 अंकांनी किंवा 1.35 टक्क्यांनी घसरून 51,822.53 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 225.50 अंकांच्या (1.44 टक्के) घसरणीसह 15,413.30 वर बंद झाला.

आजच्या व्यवहारात सेन्सेक्स कंपन्यांमध्ये टाटा स्टील सर्वात जास्त 5.24 टक्क्यांनी घसरला. विप्रो आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्सही 3-3 टक्क्यांहून जास्त घसरले.

 

या आठवड्यात बाजाराने केली चांगली सुरुवात

मात्र, मंगळवारी व्यवहार संपल्यानंतर बीएसई सेन्सेक्स 934.23 अंकांनी (1.81 टक्के) वाढून 52,532.07 अंकांवर होता.
एनएसई निफ्टी 288.65 अंकांनी (1.88 टक्के) झेप घेऊन 15,638.80 वर बंद झाला.

रिलायन्स आणि टीसीएस सारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स तसेच आयटी आणि बँकिंग स्टॉक्स (Banking Stocks) मुळे बाजाराला मदत झाली.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी मर्यादित कक्षेत चढ-उतार झाला होता.

व्यवहार बंद झाल्यानंतर सेन्सेक्स 237.42 अंकांनी (0.46 टक्के) 51,597.84 अंकांवर आणि निफ्टी 56.65 अंकांनी (0.37 टक्के) वाढून 15,350.15 वर होता.

 

आशियाई बाजारात घसरणीचा कल

अमेरिकन बाजार (US Stock Market) सोमवारी जूनटींथच्या निमित्ताने बंद होता.
मंगळवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल अ‍ॅव्हरेज (Dow Jones Indutrial Average) 2.15 टक्क्यांनी फायद्यात होता.

टेक-फोकस्ड इंडेक्स नास्डॅक (Nasdaq Composite) 2.51 टक्क्यांनी आणि एस अँड पी 500 (S&P 500) मध्ये 2.45 टक्क्यांची तेजी होती.
आज आशियाई बाजारात घसरणीचे वर्चस्व आहे.

जपानचा निक्की (Nikkei) 0.37 टक्क्यांनी घसरून बंद झाला.
हाँगकाँगचा हँगसेंग (Hangseng) 2.56 टक्क्यांनी आणि चीनचा शांघाय कंपोझिट (Shanghai Composite) 1.20 टक्क्यांनी घसरला.

 

Web Title :- Indian Stock Market Today | indian share market bse sensex nse nifty today after days of recovery asian market falling

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा