‘या’ कारणामुळे शेअर बाजारात ‘तेजी’, गुंतवणूकदारांना झाला 1.93 कोटींचा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही काळापासून काळापासून सुरु असणारी शेअर बाजारातील घसरण आता थांबली आहे. मोदी सरकारकडून परकीय गुंतवणूकदारांना (FPIs) च्या सरचार्ज(अधिभार) पासून सुटका मिळण्याच्या अपेक्षेने सेंसेक्स आणि निफ्टी वरच्या स्तरावर जाऊन थांबला. गुरुवारच्या सत्रात बीएसई (BSE) चा ३० शेअर्स चा प्रमुख इंडेक्स सेंसेक्स (Sensex) ६३६ अंकांनी वाढून ३७,३२७ वर आणि एनएसई (NSE) चा ५० शेअर्स चा प्रमुख इंडेक्स निफ्टी (Nifty) १७७ अंकांनी वाढून ११,०३२ वर थांबला. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार काही तासांतच गुंतवणूकदारांचा जवळपास १.९३ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

का आली शेअर बाजारात तेजी :

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारने दिलेल्या संकेतानुसार लवकरच फॉरेन पोर्टफोलियो इन्वेस्टर्स (FPIs) म्हणजेच परकीय गुंतवणूकदारांवरील सरचार्ज रद्द केला जाणार आहे. या बातमीनंतर शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यातच प्रधानमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेतली आहे. त्यानंतर सातत्याने सरचार्ज रद्द होणार असल्याच्या बातम्या येत आहे.

५ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये परदेशी गुंतवणूकदारांवर सरचार्ज जाहीर केला. यानंतर गुंतवणूकदारांकडून शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे. जुलैमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून सुमारे ११,७४० कोटी रुपये काढले. यानंतर सेन्सेक्स २००० अंकांनी खाली आला होता.

गुंतवणूकदारांना १.९३ लाख कोटी रुपयांचा फायदा –

आज बीएसई वरील नोंदणीकृत कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्यांकन १,३८,८२,३३०.९५ कोटी रुपयांवरून वाढून १,४०,७५,६५४.६८ कोटी रुपये झाले. अशा परिस्थितीत काही तासांत गुंतवणूकदारांना १.९३ लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त