‘मॅजिक’ दाखविण्यासाठी पिंजर्‍याला तब्बल 36 कुलप लावून गंगेत बुडाला, पुढे झाले ‘असे’ काही

कोलकाता : वृत्त संस्था – एका जादूगाराला स्टंटबाजी अंगलट आली आहे. या जादूगाराने स्वतःचे हातपाय बांधून ३६ कुलूपांनी बंद केलेल्या पिंजऱ्यात स्वतःला कोंडून घेत पिंजरा गंगा नदीत बुडवला. मँड्रेक या नावाने प्रसिद्ध असलेले जादूगार चंचल लाहिरी गायब झाले आहेत. कुटुंबीय, प्रसारमाध्यमे, पोलीस यांच्या उपस्थितीत त्यांनी हा जीवघेणा स्टंट केला आहे.

आता जादूगार चंचल लाहिरी यांचा प्रशासनाकडून गंगा नदीपात्रात शोध घेतला जात आहे. स्टीलच्या पिंजऱ्यात ३० फूट पाण्याखाली जाऊन त्यांनी हा जीवघेणा स्टंट केला आहे. मी स्वतःला सोडवू शकलो तर ती जादू असेल अन्यथा ती एक शोकांतिका असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी स्टंट करण्यापूर्वी दिली होती. याच ठिकाणी वयाच्या १९ व्या वर्षी चंचल लाहिरी यांनी अशाच प्रकारचा स्टंट याच ठिकाणी केला असल्याची माहिती त्यांनीच दिली होती.

२०१३ मध्ये लाहिरी यांनी अशाच प्रकारचा स्टंट केला होता मात्र बघ्यांनी त्यावेळेस गोंधळ घातला होता. बॉक्सच्या बाहेर पडताना पाहिल्यानंतर उपस्थित लोकांनी त्यांना त्रास दिला होता. यावेळी त्यांनी स्वतःला सोडवणं अधिक कठीण असेल असं सांगितले होते.

सिनेजगत

Video : छोटया पडद्यावरील ‘हॉट’ अभिनेत्री निया शर्माची ‘सोशल’वर धुमाकूळ

अभिनेता हृतिक रोशन पेक्षाही त्याची ६४ वर्षाची आई फिटनेस ‘सजग’ ; पहा फोटो, व्हिडिओ

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’