WTC Final Squad : 4 ओपनर, 9 फास्ट बॉलर अन् 2 किंवा 3 विकेट किपरः BCCI निवडणार टीम इंडियाचा संघ

पोलीसनामा ऑनलाइन – जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी भारताचा न्यूझीलंडबरोबर सामना होणार आहे. त्यासाठी बीसीसीआय आणि निवड समिती आज जम्बो संघ घोषित करण्याची शक्यता आहे. क्रिकबझने याबाबतचे वृत्त दिले असून या संघात चार सलामीवीर, ४-५ मधल्या फळीतील फलंदाज, ४-५ फिरकीपटू, ८-९ जलदगती गोलंदाज अन् २-३ यष्टिरक्षक असण्याचा दावाही केला आहे. दरम्यान, या सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडसोबत पाच सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार असल्याचे समजते.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तयारीसाठी भारतीय संघातील खेळाडूंची अधिक संख्या फायद्याची ठरू शकेल. संघाला इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आंतर संघ सामने खेळवण्यात टीम इंडियाला मदत मिळेल, असे संघ व्यवस्थापनाला वाटते. भारतीय संघात मोठे बदली पाहायला मिळण्याची अपेक्षा थोडीच आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील संघच कायम राहील असे संकेत चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीकडून मिळत आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याने इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत गोंदाजी केली नव्हती. त्यामुळे त्याला संधी दयायची कि नाही यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पृथ्वी शॉ याच्या पुनरागमनाचा चर्चेचा मुद्दे असेल. परंतु, WTC Final साठी शुबमन गिल, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल हे चार सलामीवीर पक्के आहेत. मात्र चार महिन्यांचा दौरा लक्षात घेतल्यास पृथ्वीने चंगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला संधी मिळू शकते. मोहम्मद शमीचे पुनरागमन होईल. आवेश खानच्या नावाचा विचार होऊ शकतो. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर या पर्यायांचाही विचार होऊ शकते.

इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे २५ वर्षीय प्रसिद्ध कृष्णाला लॉटरी लागू शकते. त्याला पर्याय नवदीप सैनी आहे, परंतु प्रसिद्धच्या कामगिरीवर निवड समिती खूश आहे. दुखापतीमुळे रवींद्र जडेजा व हनुमा विहारी हे इंग्लंडविरुद्धची मालिका खेळले नव्हते. त्यामुळे त्यांचेही पुनरागमन होणार आहे. फिरकीची जबाबदारी आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्यावर असेल तर मधली फळी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे सांभाळतील. वॉशिंग्टन सूंदर हाही संघाचा भाग असेल. रिषभ पंत व वृद्धिमान सहा यांच्यासह केएस भरत हा यष्टिरक्षक म्हणून तिसरा पर्याय असू शकतो.