भुतानमध्ये भारतीय पर्यटकानं केलं ‘लज्जास्पद’ कृत्य, होतीय ‘थू-थू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भूतानमध्ये फिरायला गेलेल्या भारतीय पर्यटकांनी तेथील धार्मिक स्थळांवर फोटो काढणे चांगलेच महागात पडले आहे. भारतीय पर्यटकांनी भूतानमधील डोलूचा स्थित नॅशनल मेमोरिअल चोर्टन म्हणजेच बौद्ध स्तुपावर उभे राहून फोटो काढल्याने चांगलेच अडचणीत सापडले आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. स्थानिकांच्या भावना दुखावल्याने पोलिसांनी हि कारवाई केली आहे.

अटक करण्यात आलेल्या पर्यटकाचे नाव अभिजीत रतन हजारे असून तो महाराष्ट्रातून भूतानमध्ये पर्यटनासाठी गेला होता. भारतातून 15 जणांची टीम गाडीवर भूतानमध्ये गेले होते. यामध्ये अभिजीत रतन हजारे याचा देखील समावेश होता. सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला असून त्याचा पासपोर्ट देखील जप्त केला आहे. त्यांनी फोटो काढलेली जागा हि बौद्ध स्तूप असून बौद्ध धर्माचे धार्मिक स्थळ आहे. याविषयी त्याच्याबरोबर गेलेल्या इतर पर्यटकांनी सांगितले कि, ते स्तूप आहे याची माहिती त्याला नव्हती. त्यामुळे त्याने याठिकाणी फोटो काढले.

दरम्यान, सोशल मीडियावर यासंदर्भात फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्याच्या कृत्याची निंदा केली होती. तसेच कारवाईची मागणी केली होती.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी