सण-उत्सवांच्या हंगामात चीनला मोठा धक्का देणार भारतीय व्यापारी ! चायनीज वस्तू विकणार नाहीत, स्वदेशी दिवाळी करणार साजरी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत-चीन तणाव (India-China Rift) दरम्यान देशातील व्यावसायिकांनी यावेळी स्वदेशी वस्तूंच्या माध्यमातून दिवाळी साजरी करून चीनला मोठा धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी व्यापारी संघटना कॅट (CAIT) च्या आवाहनानुसार या दिवाळीत देशातील कोणत्याही बाजारात चीनमध्ये बनविल्या गेलेल्या वस्तू विकल्या जाणार नाहीत, तर केवळ भारतात बनवलेल्या स्थानिक उत्पादनांसह (Local Products) बाजारपेठा प्रकाशित होतील. व्यापाऱ्यांनी त्याची तयारी देखील सुरू केली आहे. कॅटने सांगितले की या वेळी लोकांना सणसमारंभात (Festive Season) भारतातच तयार केलेल्या मुर्त्यांपासून ते भेटवस्तूपर्यंत आणि झालर पासून ते इतर उत्पादनांपर्यंत सर्व वस्तू उपलब्ध करुन देण्यात येतील.

दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांनी केली ही तयारी

याआधी सणासुदीच्या काळात भारतीय बाजारात (Indian Markets) चिनी वस्तूंचे वर्चस्व असणे ही एक सामान्य बाब होती. मात्र आता आर्थिक आघाडी (Economic Front) वर चीनला तोंडघशी पाडण्याच्या मोहिमेमध्ये केंद्र सरकारला व्यापाऱ्यांची साथ मिळाली आहे. दिवाळीच्या दृष्टीने व्यापाऱ्यांनी दोन महिने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. चीन किंवा इतर देशांवर अवलंबून राहता येऊ नये म्हणून व्यापाऱ्यांनी देशातील चार राज्यांमध्ये सण-उत्सवांशी संबंधित वस्तू बनवण्याचे काम सुरू केले होते. दरवर्षी भारत रक्षाबंधनपासून ते दिवाळीपर्यंत चीनमधून जवळपास 40 हजार कोटींचा माल आयात (Import) करतो. व्यापारी ‘मेड इन इंडिया’ अंतर्गत वस्तूंचे वितरण करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media) चा देखील वापर करत आहेत.

परदेशातही भारतीय वस्तूंचा बोलबाला

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, देशातच नव्हे तर परदेशातही भारतीय वस्तूंची मागणी वाढली आहे. यावर्षी दिवाळीशी संबंधित वस्तू जसे की दिवे, लायटिंग्स, रंगीबिरंगी बल्ब, सजावटीच्या मेणबत्त्या, सजावटीच्या विविध वस्तू, चंदन, रांगोळी आणि शुभ लाभ ची चिन्हे, भेट वस्तू, पूजेच्या वस्तू, मातीचे पुतळे यासह बऱ्याच वस्तूंचे उत्पादन भारतीय कारागिरांनीच केले आहे. भारतीय कारागिरांचे कौशल्य व्यापारी बाजारपेठेपर्यंत पोहोचवतील. याशिवाय ऑनलाईन, सोशल मीडिया प्रोग्राम्स व व्हर्च्युअल प्रदर्शनातून देखील या वस्तूंचे देशभर प्रदर्शन केले जाणार आहे.