भारताला ‘वर्ल्डकप’ जिंकून देणार्‍या खेळाडूला DDCAचा दणका, घातली वर्षाची ‘बंदी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात क्रिकेटसह अनेक क्रीडा प्रकारांत खेळाडू वयचोरी करत असल्याचं समोर येत आहे. याविषयी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने थेट भाष्य केले आहे. एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचं समालोचन करतेवेळी एका खेळाडूला उद्देशून त्याने म्हंटले कि, ‘भारतात सर्वच खेळाडू वयचोरी करत असतात. तुम्ही तुमच्या काळात असं केलं असेल’. दरम्यान, सेहवाग याच्या या विधानामुळे वयचोरी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना दणका बसला आहे.

दरम्यान, सलामीवीर मनजोत कालरा या क्रिकेटपटूला अंडर-16 आणि अंडर-19 मध्ये खेळताना कथित वयचोरी केल्याप्रकरणी एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. मागील अंडर-19 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये शतक झळकावत त्याने भारताला विजय मिळवून दिला होता. दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोशिएशन (DDCA) ने रणजी ट्रॉफी खेळण्यापासून मनजोतला एका वर्षाची बंदी घातली आहे. तसेच त्याला वयोगट स्पर्धांमध्ये खेळण्यापासून 2 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

BCCI रेकॉर्ड्सनुसार मनजोत कालरा याचं वय 20 वर्ष 351 दिवस इतकं आहे. कालराने मागील आठवड्यात दिल्ली अंडर-23 संघाकडून बंगालविरुद्धच्या सामन्यात 80 धावाही केल्या होत्या. त्यामुळे मनजोत हा रणजी टीममध्ये शिखर धवन याची जागा घेण्याच्या स्पर्धेत होता. परंतु आता वर्षभरासाठी त्याच्या रणजी क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मनजोत कारलासोबतच दिल्लीचा उपकर्णधार नितीश राणा यांच्यावरही वयचोरीप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. मात्र, सध्या ही कारवाई मागे घेण्यात आली आहे. पुरेसे पुरावे सादर करण्याच्या सूचना देत राणाला सोडून देण्यात आलं आहे.

दरम्यान, दीपक वर्मा हे दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोशिएशन (DDCA)मध्ये नवे लोकपाल म्हणून रुजू होणार आहेत. त्यामुळे मनजोत कारला प्रकरणात पुन्हा नव्याने तपास करणार का ? सोबतच वयचोरीवरून मनजोत कारलाला सीनिअर स्तरावरील क्रिकेट खेळण्यापासून का रोखण्यात आलं, असे अनेक साल उपस्थित केले जात आहेत.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/