केवळ 18 % भारतीयच वापरतील WhatsApp, सर्वेमध्ये झाला आश्चर्यकारक खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  जगात सर्वात जास्त वापरले जाणारे फ्री मॅसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्याच प्रायव्हसी पॉलिसीमुळे वाईट प्रकारे अडचणीत आले आहे. लोक आतापासून व्हॉट्सअ‍ॅपला बाय-बाय करून नव्या पर्यायाच्या शोध घेऊ लागले आहेत. यादरम्यान एका सर्वेत खुलासा झाला आहे की, आगामी काळात केवळ 18 टक्के भारतीय व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतील, तर 36 टक्के भारतीय यूजर्स व्हॉट्सअ‍ॅपचा वापर कमी करतील.

फेसबुकची मालकी असलेली कंपनी व्हॉट्सअ‍ॅपने नुकतीच आपल्या यूजर्ससाठी नवी पॉलिसी आणली होती. इतकेच नव्हे, व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्सवर नवी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यासाठी दबाव सुद्धा टाकला होता. व्हॉट्सअ‍ॅपने एक निश्चित तारीख देऊन यूजर्सला इशारा दिला होता की, जर त्यांनी नवी पॉलिसी स्वीकारली नाही तर त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप बंद होईल.

कंपनीच्या या भूमिकेमुळे सोशल मीडियावर लोकांनी व्हॉट्सअपविरूद्ध प्रचंड संताप व्यक्त केला. लोक व्हॉट्सअ‍ॅप सोडून दुसर्‍या अ‍ॅपवर जाण्याबाबत बोलू लागल्यानंतर कंपनीच्या डोळ्यावरील धुंदी उतरली आणि त्यांनी आपली प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्याची तारीख वाढवली. कंपनीने रविवारी आपल्या सर्व यूजर्सला आपले स्टेटस पाठवले आणि सांगितले की, त्यांच्या प्रायव्हसीसोबत कोणतीही छेडछाड होणार नाही.

या दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका सर्वेतून असा खुलासा झाला आहे की, त्यांचे निष्कर्ष ऐकून कंपनीची झोप उडू शकते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म LocalCircles ने केलेल्या सर्वेत 8,977 यूजर्सने भाग घेतला. सर्वेत समजले की, आगामी काळात केवळ 18 टक्के भारतीयच व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या धोरणासोबत तडजोड करून याचा वापर सुरू ठेवतील आणि आपल्या डाटाचा वापर करू देतील.

समोर आलेल्या सर्वेच्या निष्कर्षांमधून समजले की, सुमारे 36 टक्के भारतीय यूजर्स व्हॉट्सअ‍ॅपचा वापर कमी करतील, तर 15 टक्के यूजर्स तर याचा वापर पूर्णपणे बंद करतील. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या धोरणानंतर यूजर्सना भिती आहे की, कंपनी आपल्या गरजेसाठी त्यांचा डाटा वापरू शकते. अशावेळी लोक सिग्नल आणि टेलीग्राम सारख्या फ्री मॅसेजिंग अ‍ॅपकडू वेगाने जाऊ लागेल आहेत.