भारतातील कोरोना व्हेरिएंटचा 44 देशांमध्ये प्रादुर्भाव – WHO

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील अनेक देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरिएंट हा भारतात सापडलेला व्हेरिएंट असल्याची पुष्टी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहीती बुधवारी (दि.12) जाहीर केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, भारतात कोरोना रुग्ण वाढीमागे B.1.617 व्हेरिएंट जबाबदार आहे. विशेष म्हणजे
भारताव्यतिरिक्त या व्हिरिएंटमधील सर्वाधिक रुग्ण ब्रिटनमध्ये आढळून आले आहेत. मार्च 2020 मध्ये भारतात कोरोनाने शिरकाव केला होता. त्यानंतर कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढला आहे.

WHO ने सांगितले की, कोरोनाच्या B.1.617 व्हेरिएंटचे जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सहा क्षेत्रांतील 44 देशांकडून एक ओपन एक्सेस डेटाबेसमध्ये अपलोड झालेल्या 4500 पेक्षा अधिक नमुने आढळून आले आहेत. ऑक्टोबरमध्ये हा व्हेरिएंट पहिल्यांदा भारतात सापडला होता. संघटनेच्या साप्ताहिक अपडेटमध्ये म्हटले आहे की, जागतिक आरोग्य संघटनेला पाच अतिरिक्त देशांमधील प्रकरणांचे अहवाल प्राप्त झाले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला संघटनेने या व्हेरिएंटला ‘व्हेरिएंट ऑफ कंसर्न’ असे म्हटले होते.

यापूर्वी ब्रीटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका देशात आढळून आलेल्या व्हेरिएंटचा या यादीमध्ये समावेश होता. हा व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचे मानले जाते. कारण तो एकतर वेगाने पसरु शकतो किंवा लसीपासून वाचण्यास सक्षम आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी सांगितले की, B.1616 या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. कारण ते वास्तविक व्हायरसपेक्षा अधिक संसर्गजन्य दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटना सध्या इतर देशांमध्ये वेगाने वाढणाऱ्या घटनांवर लक्ष केंद्रीत करत आहे.