भारतीय महिला संघाच्या क्रिकेटपटूकडे मॅच ‘फिक्स’ करण्यासाठी ‘कॉन्टॅक्ट’, दोघे ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट हा भारतातच नव्हे तर जगभर अतिशय लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जातो. भारतात क्रिकेटचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे क्रिकेटशी संबंधित कुठलीही घटना लागलीच चर्चेत येत असते. अशीच एक अपूर्व घटना या वर्षाच्या सुरवातीस महिला क्रिकेट पटूच्या बाबतीत घडली होती. ती घटना म्हणजे भारतीय महिला संघांच्या क्रिकेटपटूकडे क्रिकेटचे सामने निश्चित करण्यासाठी २ व्यक्तींनी संपर्क साधला असल्याचे आता उघडकीस आले आहे. यावरून बीसीसीआय च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी २ जणांविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

घडेलला हा प्रकार फेब्रुवारी महिन्यामध्ये इंग्लंड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या घरेलू मालिकेच्या आधी घडला असल्याचे समोर आले आहे. हे तेव्हा समोर आले जेव्हा महिला क्रिकेटपटूने क्रिकेट मंडळाच्या लाचलुचपत विभागाला स्वतःहून याबाबत माहिती दिली.

महिला क्रिकेट पट्टुनी योग्य काम केले –

सदरील घटनेची माहिती पीटीआय ला एसीयू चे प्रमुख अजितसिंग शेखावत यांनी दिली आहे. ते म्हणाले की, ही एक भारतीय महिला क्रिकेटर असून ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटर सुद्धा आहे. त्यामुळे आयसीसी ने सुद्धा या घटनेची चौकशी सुरु केली आहे. या घटनेची माहिती देताना शेखावत म्हणाले की, ज्या व्यक्तींनी सामना निश्चित करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने संपर्क साधला होता त्या व्यक्तींना आयसीसीने चेतावणी दिली असून हे मान्य केले आहे की, भारतीय महिला क्रिकेटपटूने घटनेची माहिती एसीयू कडे नोंदवून अतिशय योग्य काम केले आहे.

आरोपींवर एफआयआर दाखल –

महिला क्रिकेट पटूकडे सामना निश्चित करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने संपर्क करण्याऱ्या व्यक्तींची नवे राकेश बाफना आणि जितेंद्र कोठारी अशी आहेत. एसीयू ने आरोपींच्या विरोधात बेंगलोर पोलिसांकडे एफआयआर नोंदवला असून पोलीस या प्रकारची कसून चौकशी करत आहेत.