10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 3378 जागांसाठी भरती; जाणून घ्या

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – सध्या लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत 10 वी पास तरुणांसाठी रेल्वेत (indianrailways) सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय रेल्वेने (indianrailways) दक्षिण रेल्वे विभागातंर्गत अपरेंटिसच्या 3378 पदासाठी अर्ज मागवले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर sr.indianrailways.gov.in जाऊन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरु होणार असून 30 जून अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

 

मक्याची भाकरी खाण्याचे अनेक फायदे, दूर होते कब्जची समस्या, जाणून घ्या

 

या पदासाठी उमेदवार हा 10 वी पास आणि आयटीआय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारांसाठी वयोमर्यादा 15 ते 24 वयोगट ठेवला आहे. अर्ज भरण्यासाठी 100 रुपये शुल्क ठेवला आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच उमेदवार थेट https://sr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,4,16 या लिंकवर क्लिक करून अर्ज करता येईल. जाहिरातीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी https://sr.indianrailways.gov.in/view_section.jsp?fontcolor=black&backgroundColor=LIGHTSTE या लिंक वर क्लिक करा. या भरतीअंतर्गत 3 हजार 378 जागा भरल्या जाणार आहेत. ज्यात 936 कॅरिज वर्क्स, 756 रिक्त गोल्डनरॉक वर्कशॉप आणि 1686 सिग्नल तसेच टेलिकॉम वर्कशॉप पदासाठी अर्ज करू शकतात.

 

Also Read This : 

 

 

Maratha Reservation : चंद्रकांत पाटलांचा संभाजीराजेंना सवाल, म्हणाले – ‘कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर येईपर्यंत मराठा समाजानं थांबायचं का?’

 

weight loss yoga exercise : वजन कमी करून ‘हेल्दी अँड फिट’ बॉडी मिळवण्यासाठी करा ‘ही’ 5 योगासन

 

तुम्ही ग्लासऐवजी बाटलीने पाणी पिता का? जाणून घ्या नुकसान

 

 

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

 

Pune : कोरोनाच्या संकट काळात देखील लाचखोरी जोमात; पोलिस अव्वल