‘चांद्रयान-२’ संबंधी नासाने केलेल्या ट्विटवर भडकले भारतीय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्रोने चांद्रयान २ मिशन यशस्वीरीत्या लाँच केले. इस्रोच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु अमेरिकेची कंपनी नासाच्या एका ट्विटमुळे भारतीय चांगलेच नाराज झाले आहेत.

image.png

नासाने इस्रोला चांद्रयान २ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल शुभेच्छा देताना लिहिले की, इस्रोला चांद्रयान २ च्या लॉन्चिंगबद्दल शुभेच्छा. आम्हाला अभिमान आहे की, तुमच्या मिशनमध्ये आमच्या डीप स्पेस नेटवर्कचा वापर केला आहे. आम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची माहिती घेण्यासाठी उत्सुक आहोत आणि येणाऱ्या वर्षात आम्ही आर्टेमिस मिशनद्वारे अंतरराळवीर पाठवणार आहोत.

नासाच्या या ट्विटमध्ये भारतीयांना नासाचा अहंकार दिसून आला आहे. केतन नावाच्या युजरने लिहिले की, नासा इस्रोला कमी लेखत आहे की, शुभेच्छा देत आहे असो आपल्या भावी चांद्रयान अभियानासाठी शुभेच्छा. अनिल शर्मा या युजरने लिहिले की, ओह, आमचे डीप स्पेस नेटवर्क ! नासा ही गोष्ट अशी सांगत आहे की, जसे एखाद्या विद्यार्थ्याने स्टेशनरीचा वापर करून टॉप केले आहे. श्रीजन नावाच्या एका युजरने लिहिले की, नासा जेव्हा यशस्वी होते तेव्हा त्यांच्या यशाविषयी चर्चा करते आणि दुसऱ्यांनी यश मिळवले तरी स्वतःचीच पाठ स्वतःच थोपटून घेत.

मुनमुन दास यांनी लिहिले की, नासाचा अहंकार स्पष्टपणे दिसून येत आहे. आम्ही कोणत्याही वेळी हा अहंकार तोडू शकतो. नासाला उद्देशून दास म्हंटले की, तुम्ही हे विसरू नका की, तुमचे बहुतांश शास्त्रज्ञ हे भारतीय वंशाचे आहेत. तुमच्या जवळ पैसा आहे तर आमच्याजवळ मेंदू आहे. आम्ही तर आता फक्त सुरवात केली आहे.

image.png

शेवटी भारतीयांनी केलेल्या जबरदस्त टीकेला नासाला प्रत्युत्तर द्यावे लागले. नासाने म्हंटले की, आम्ही जगभरातील शोध अभियानासाठी नेहमी मदत करत आलो आहोत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे.