भारतीयांना कोरोनाविरूध्द लढायचं असेल तर त्यांनी ‘या’ व्हायरसपासून सावधान रहावं; अमेरिकेच्या प्रसिध्द सर्जन जनरल यांच्याकडून इशारा

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण आता यावरूनच अमेरिकेतील सर्जन जनरल विवेक मूर्ती यांनी भारतात कोरोनाविरोधातील लढाईबाबत मोठं विधान केले आहे. कोरोना संबंधित चुकीची माहितीवरून सावध राहणे गरजेचे आहे. जर तुम्ही काहीही वाचत असाल, बोलत असाल, सोशल मीडियावर फॉरवर्ड करत असाल तर त्यामध्ये समावेश असलेल्या खोट्या बातम्याही व्हायरसपेक्षा कमी नाहीत.

कोरोना व्हायरसचा संसर्ग जसजसा वाढत गेला तसतसं त्याबाबतचे समज-गैरसमज मोठ्या प्रमाणात होऊ लागले. त्याचे प्रमुख माध्यम होते सोशल मीडिया. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांना याचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील सर्जन जनरल विवेक मूर्ती यांनी भारतात कोरोना संकटादरम्यान चुकीच्या आणि खोट्या बातम्यांबाबत भाष्य केले.

ते म्हणाले, ‘चुकीची माहिती एकप्रकारचा व्हायरसच आहे. लोकांना याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे एकमेकांवर याचा परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला योग्य माहिती मिळाली तर तुम्ही चांगले पाऊल उचलून स्वत:चे रक्षण करू शकता. मात्र, जर तुम्हाला चुकीची माहिती दिली गेली तर धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते.’

चुकीच्या माहितीमुळे दोन्ही देशांत संबंध बिघडले

अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांत कोरोना महामारीने जास्त प्रभावित लोक आहेत. या दोन्ही देशांत कोरोनाबाधित आणि मृतांचा आकडा जास्त आहे. या दोन्ही देशांना चुकीच्या माहितीमुळे मोठा त्रास सहन करावा लागला आहे. काहींनी तर मुद्दाम परिस्थिती बिघडावी यासाठी खोटी माहिती पसरवली. त्यामुळे नागरिकांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मास्क लावण्याकडे विशेष लक्ष दिले नाही.

चुकीची माहिती व्हायरससारखी पसरते

अमेरिकेच्या टॉप डॉक्टरांनी सांगितले, की अमेरिकेतील नागरिकांना वाटले होते, की अँटी व्हायरल औषध क्लोरोक्वाईनमध्ये जादूई क्षमता आहे आणि ते कोरोना व्हायरसला पळवून लावेल. तसेच भारतीयांना वाटले होते, की कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी प्राकृतिकपणे मजबूत प्रतिरोधक मानले जाते.