‘कोरोना’ काळात बदलली लोकांची खर्च करण्याची पद्धत, ‘या’ वस्तूंसाठी देतायेत सर्वात जास्त पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक महिन्यांच्या लॉकडाऊननंतर लोकांची खरेदी करण्याची पद्धत सुद्धा बदलली आहे. खर्च करण्याच्या पद्धतीवरून समजते की, भारतीय लोक आपल्या आणि जवळच्यांच्या सुरक्षेसाठी किती चिंतीत आहेत. सर्वसामान्य लोकांच्या खर्च करण्याच्या या पद्धतीमुळे काही कंपन्यांना फायदासुद्धा होत आहे. अलिकडच्या काळात बाजारात काही अशा वस्तूंच्या मागणीत वाढ झाली आहे, ज्यावरून समजते की, खरेदीच्या व्यवहारात किती बदल झाला आहे. ब्लूमबर्गने आपल्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. ते कोणते प्रॉडक्ट आहेत, ज्यांची मागणी भारतीय बाजारात वाढली आहे आणि लोकांच्या खरेदीची पद्धत कशी बदलली आहे, ते जाणून घेवूयात….

च्यवनप्राशच्या विक्रीत मोठी वाढ
जगभरातील लोक महामारीचा विचार करून आपले आरोग्य आणखी चांगले करण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जास्त खर्च करत आहेत. सामान्यपणे भारतात याचा अर्थ आयुर्वेद समजला जातो. डाबर इंडिया, द हिमालयन ड्रग सारख्या कंपन्यांच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. या कंपन्या च्यवनप्राश, सेप्टीलिन, गुळवेलसारखे उत्पादनांची विक्री करतात. या इंडस्ट्रीत जून दरम्यान च्यवनप्राशच्या सेलमध्ये 283 टक्केंची वाढ झाली आहे.

नेल्सन होल्डिंग्स, पीएलसी, डाबरनुसार मधाची मागणी देखील वाढली आहे. या कंपनीने म्हटले की, एप्रिल ते जूनच्या दरम्यान त्यांच्या च्यवनप्राशच्या विक्रीत सुमारे 700 टक्के वाढ झाली आहे. येत्या काही महिन्यात सुद्धा या वस्तूंवर होणारा खर्च वाढता राहणार आहे. ब्रिकवर्क रेटिंग्सने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, एप्रिल ते जून दरम्यान पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या उत्पादनांचा सेलसुद्धा वाढला होता.

पॅकेज्ड फूड्सची मागणी वाढली
मार्चनंतर पॅकेज्ड फूडच्या सेल्समध्ये वाढ झाली आहे. यामध्ये ब्रेकफास्ट सेरेल्स, इन्स्टंट नूडल्स, तांदूळ सारख्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. मार्च तिमाहीत नेस्ले इंडिया लिमिटेडच्या मॅगी नूडन्यच्या रेव्हेन्यूमध्ये 10.7 टक्केंची वाढ झाली आहे. मॅगी, किटकॅट आणि मंचचा सेल सुद्धा वाढला आहे. पारले जी बिस्किट्सची मागणी सुद्धा एप्रिल-मेच्या दरम्यान वाढली आहे. सरकार आणि संस्थांनी मोठ्याप्रमाणात बिस्किटांचे वाटप केले होते. ब्रिटानियाच्या प्रॉडक्टची मागणी सुद्धा वाढली आहे.

टेक्नॉलॉजीवर वाढले अवलंबत्व
लॉकडाऊन दरम्यान टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्सची मागणी वाढली आहे. ऑनलाइन एज्युकेशन स्टार्टअप बाइजसवर नव्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आता कंपनी आपल्या नव्या यूजर्सला रिटन करून प्लॅनवर काम करत आहे. याच कारणामुळे लोकल भाषांमध्ये सुद्धा या प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त सब्जेक्ट्स उपलब्ध केले जात आहेत. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टचे म्हणणे आहे की, मार्चनंतर लॅपटॉपसाठी होणारे सर्च दुप्पट झाले आहेत. जी5 के सब्सक्रिप्शनमध्ये सुद्धा मेदरम्यान 33 टक्के वाढ झाली आहे.

गोल्ड लोनच्या मागणीत वाढ
अर्थव्यवस्थेत स्लोडाऊनचा काळ आहे आणि लाखो लोक बेरोजगार होत आहेत. या कारणामुळे गरीब वर्गातील लोक आपल्याजवळील सोने ठेवून मदत घेत आहेत. छोटे व्यापारी सर्वात जास्त गोल्डच्या बदल्यात लोन घेत आहेत. यामुळे काही फर्म्सला फायदा होत आहे. मुथूट फायनान्स लिमिटेडच्या शेयर्समध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत या फर्मच्या शेयर्समध्ये 57 टक्केंची वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आता ही कंपनी एमएससीआय इंडिया इंडेक्ससाठी तयारीत आहे. मन्नापुरम फायनान्स लिमिटेडच्या गोल्ड लोन पोर्टफोलियोमध्ये सुद्धा 4.5 टक्के वाढ झाली आहे.

घरगुती अप्लायन्सेस खरेदी करत आहेत भारतीय
जुलै महिन्यात लोकांनी ज्यूसर्स, मिक्सर्स, मायक्रोवेव्हज अवन आणि टोस्टर्सबाबत सर्वात जास्त माहिती सर्च केली आहे. यामध्ये चारपट वाढ झाली आहे. सोबतच वॅक्युम क्लीनर्सची मागणी सुद्धा वाढली आहे. या वर्षी एका मोठ्या कालवधीपर्यंत सलून बंद होते. या कारणामुळे पुरुषांच्या ग्रुमिंग किटची मागणी वाढली आहे. हॅवेल्स इंडिया लिमिटेडच्या ट्रिमर्सच्या सेल्समध्ये वाढ झाली आहे. कंपनीने सांगितले की, त्यांच्या मासिक सेल्समध्ये कोरोना काळात आधीच्या तुलनेत पाचपट वाढ झाली आहे. सुमारे एक चतुर्थांश भारतीय लोक होम केयर प्रॉडक्टवर खर्च करत आहेत. यामध्ये 18 ते34 वर्षांचे लोक आहेत. विशेष म्हणजे भारतात या वयाच्या तरूणांची संख्या सर्वात जास्त आहे. असाच ट्रेंड कायम राहिल्यास कंपन्यांना चांगला लाभ होणार आहे.