Coronavirus : खुशखबर ! 73 दिवसांमध्ये भारतीयांना मिळणार ‘कोरोना’विरूध्दची लस, केंद्र सरकारकडून अगदी मोफत लसीकरण

पोलिसनामा ऑनलाईन – तब्बल पाच महिन्यांपासून धुमाकूळ घालणार्‍या कोरोनावर मात करण्यासाठी भारतीयांची कोरोना विषाणूवरील लसीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. येत्या 73 दिवसांमध्ये ‘कोविशिल्ड’ नावाची कोविड-19 आजारावरील लस पहिली विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या लसीवर काम करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूटने याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकार याचे मोफत लसीकरण करणार आहे.

लसीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सिरम इन्स्टिट्यूटकडून सुरु आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली असून त्याची भारतातच निर्मिती केली जाणार आहे. ‘सिरम’चे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, सरकारने ‘सिरम’ला लसीचा ‘विशेष उत्पादन प्राधान्य परवाना’ दिला आहे. तसेच चाचण्यांची प्रोटोकॉल प्रक्रिया 58 दिवसांत पूर्ण करण्यासाठी वेगाने काम करण्याचे सूचित केले होते. याद्वारे पहिला डोस हा शनिवारी (22 ऑगस्ट) त्यानंतर दुसरा डोस हा 29 दिवसांनी तयार होईल. त्यानंतर पुढच्या 15 दिवसांत अंतिम चाचणी अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर आम्ही कोविशिल्ड लस बाजारात आणण्याच्या विचारात आहोत. लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीला भारतातील 20 केंद्रांवर कालपासून सुरुवात झाली. यामध्ये प्रामुख्याने पुणे आणि मुंबईत तर गुजरातमधील अहमदाबाद येथे याची चाचणी होत आहे. या टप्प्यात 1 हजार 600 लोकांवर याची चाचणी होणार आहे.