अमेरिकेच्या पहिली महिला उपराष्ट्रपती बनणाऱ्या कमला हॅरिस बद्दल Google वर काय-काय शोधताहेत भारतीय ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 20 जानेवारी 2021 हा अमेरिकेच्या इतिहासातील एक मोठा दिवस ठरणार आहे. वास्तविक या दिवशी भारतीय-कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती होणार आहेत. याबद्दल अमेरिकेपासून ते भारतापर्यंत सर्वजण उत्सुक आहेत. पण गेल्या आठवड्यापासून भारतीय गुगलवर कमला हॅरिस यांच्याबद्दल एक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. मोठ्या संख्येने भारतीयांना हे जाणून घेण्याची इच्छा आहे कि,कमला हॅरिसला मुले आहेत की नाही. यासाठी त्यांनी गुगलवर शोध घेतला.

भारतातील गुगल ट्रेंड सर्चच्या एका आठवड्यातील निकाल पाहिला तर कमला हॅरिसबद्दल भारतीयांनी गुगलवर काही प्रश्न शोधले आहेत. जसे कि, ‘कमला हॅरिसला मुले आहेत का?’, ‘कमला हॅरिस मुले’, ‘कमला हॅरिस चिल्‍ड्रन’, ‘कमला हॅरिस हजबंड’, ‘कमला हॅरिस स्टेप चिल्ड्रेन्स’ सर्वात जास्त शोधले गेले. यासह शोधात ‘कमला हॅरिस न्यूड’ देखील 300 टक्के अधिक शोधण्यात आले.

दरम्यान, कमला हॅरिसला मुले आहेत. पण हे तिच्या पतीच्या पहिल्या पत्नीचे आहे. कमला हॅरिसने डग अमॉफशी लग्न केले आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. यात 26 वर्षाची कोल आणि 21 वर्षीय एला आहेत. कमला हॅरिसचे अमेरिकन उपाध्यक्ष बनणे अनेक प्रकारे भारतीयांसाठी खास आहे. कमला हॅरिस या पदावर असणारी पहिली महिला असण्याबरोबरच पहिली कृष्णवर्णीय महिला आहे. त्याचबरोबर, ती दक्षिण-पूर्व आशियाई प्रदेशातील पहिली महिला देखील आहे, जी अमेरिकन उपाध्यक्ष बनत आहेत.

कमला हॅरिसची आई श्यामला गोपालन तामिळनाडूच्या चेन्नईमधील रहिवासी आहे. कमला हॅरिसच्या निवडणूक प्रचारादरम्यान भारतीयांनी पूर्ण उत्साह दाखविला. बुधवारी कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणार असल्याच्या निमित्ताने तामिळनाडूतील थुलासेंद्रपुरम गावात लोकांनी गावात समारंभाचे आयोजन केले आहे.