भारतीय App ची गगनभरारी ! तब्बल 15 कोटींहून अधिक जणांनी केले अॅप ‘डाउनलोड’
पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारताचा पहिला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप आरोग्य सेतू 15 कोटी डाउनलोड्स झाला आहे. आरोग्य सेतू अॅप ने अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. अॅप 2 एप्रिल लाँच करण्यात आल्यानंतर आतापर्यंत हे अॅपने 15 कोटी युजर्सचा आकडा पार केला आहे. भारत सरकारने या अॅपला अनेक संस्थासाठी बंधनकारक केले आहे. तसेच अनेक राज्यात सार्वजनिक संस्था तसेच मॉल, सुपरमार्केट मध्ये प्रवेश करण्यासाठी सुद्धा बंधनकारक आहे.
आरोग्य सेतू अॅपने डाउनलोड्समध्ये टर्कीच्या पेंडेमिक आयसोलेशन ट्रेकिंग अॅप आणि जर्मनीच्या करोना वॉर्न अॅपला मागे टाकले आहे. या दोन्ही अॅपला अनुक्रमे 1.1 कोटी आणि 1.04 कोटी वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. ट्रेसिंग अॅप आरोग्य सेतू जगातील सर्वात जास्त डाउनलोड करण्यात येणारा कॉन्टॅक्ट अॅप बनले आहे. याला जपानच्या आणि इंडोनेशियाच्या अॅपला मागे टाकले आहे. आरोग्य सेतू अॅप अँड्रॉयड स्मार्टफोन्स आणि आयफोन दोन्हीसाठी उपलब्ध आहे. हे अॅप ब्लूटूथ, लोकेशन आणि मोबाइल नंबरच्या मदतीने चेक करतो. त्यामुळे तुम्ही अशा व्यक्तीच्या संपर्कात आला नाहीत ज्याला कोरोना संसर्ग झाला आहे. अॅपमध्ये महत्त्वपूर्ण माहिती, कोविड 19 हेल्प सेंटर्स आणि सेल्फ असेसमेंट टेस्ट याचा समावेश आहे. आरोग्य सेतू अॅप इन्स्टॉल केल्यानंतर पहिल्यांदा याला ओपने केल्यास काही परमिशन मागितले जाईल. हे अॅप आपला मोबाइल नंबर, ब्लूटूथ आणि लोकेशन डेटाच्या मदतीने माहिती होते की, तुम्ही सुरक्षित आहात की तुमच्यावर संसर्गाचा धोका कायम आहे.