भारताचे प्रतिनिधी अकबरूद्दीन यांनी केली पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात नेला. यानंतर या मुद्द्यावर समर्थन मागणाऱ्या पाकिस्तानचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला असून सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला पाठिंबा देणारा चीनदेखील तोंडघशी पडला. त्यानंतर UNSC मधील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी याप्रकरणी पाकिस्तानचा बुरखा फाडत पाकिस्तानच्या पत्रकारांना निरुत्तर केले.

UNSC मध्ये झालेल्या या बैठकीत पाकिस्तान आणि चीनने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून देखील काश्मीरविषयी कोणतेही अधिकृत निवेदन जरी केले नाही. त्यामुळे चीनचा तिळपापड झाला. या सुरक्षा परिषदेनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भारताने पाकिस्तानने केलेले सर्व आरोप फेटाळून लावताना पाकिस्तानच्या पत्रकारांना निरुत्तर केले. पाकिस्तानी पत्रकारांनी भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांच्यावर प्रश्नांचा मारा करताना जम्मू काश्मीरवरील कलम ३७० संदर्भात कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आपल्या हजरजबाबीपणाने आणि शांत डोक्याने त्यांना उत्तर देत निरुत्तर केले. त्याचबरोबर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे देखील त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

दरम्यान, पत्रकारांनी त्यांना दिल्ली – इस्लामाबादशी चर्चा कधी करणार? असा प्रश्न विचारला असता. त्यांनी या पाकिस्तानी पत्रकारांशी हस्तांदोलन करत त्यांना म्हटले कि, बघा आम्ही तर शिमला करारासाठी कटिबद्ध आहोत. मात्र तुम्ही कधी यासाठी पुढे येणार असे म्हणत त्यांचे तोंड बंद केले.

आरोग्यविषयक वृत्त –