India’s Best Dancer 2 Winner | पुण्याच्या सौम्या कांबळेनं जिंकला ‘India’s Best Dancer 2’ चा किताब

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोनी टीव्हीवर (Sony TV) गाजलेल्या इंडियाज बेस्ट डान्सर सिझन-2 (India’s Best Dancer 2 Winner) अंतिम सोहळा नुकताच पार पडला. या शोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 5 स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. या पाच स्पर्धकांमधून एकाची इंडियाज बेस्ट डान्सर (India’s Best Dancer 2 Winner) ची निवड करण्यात आली. यामध्ये मराठमोळ्या सौम्या कांबळे (Saumya Kamble) हीने हा किताब पटकावला (Winner) आहे. तर गौरव सरवन (Gourav Sarwan) हा दुसरा आला.

इंडियाज बेस्ट डान्सर सिझन 2 (India’s Best Dancer 2 Winner) च्या अंतिम फेरीत सौम्या कांबळे, जमृद (Zamroodh), रोझा राणा (Roza Rana), रिक्तम ठाकुरिया (Raktim Thakuria) आणि गौरव सरवन हे पाच जण अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. त्यांच्यामध्ये ट्रॉफी मिळवण्यासाठी चुरस रंगली होती. अंतिम सोहळ्यात या पाचही स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस सादरीकरण केले. या शोचे (Reality Show) परीक्षक मलायका अरोरा (Malaika Arora), टेरेन्स लुईस (Terrence Lewis) आणि गीता कपूर (Geeta Kapoor) होते.

15 लाख अन् अलिशान कार
सौम्याला बक्षिस म्हणून 15 लाख रुपयांचा धनादेश आणि एक अलिशान कार मिळाली आहे. तिचे कोरिओग्राफर वर्तिका झा (Vartika Jha) हिला देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. वर्तिकाला 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. वर्तिकाने पहिल्या सीझनमध्ये टायगर पॉपला (Tiger Pop) प्रशिक्षण दिले होते. कोरिओग्राफर (Choreographer) म्हणून वर्तिकाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत जयपूरचा (Jaipur) गौरव सरवन हा उपविजेता (Runner-Up) ठरला तर ओडिशाची (Odisha ) रोझा राणा तिसरी (Second Runner-up) आली. अंतिम फेरीत आलेल्या प्रत्येक स्पर्धकाला 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

बेली डान्सने सर्वांची मनं जिंकली
संपूर्ण प्रवासात सौम्याने फ्री-स्टाइल आणि बेली डान्सिंग (Belly Dancing) या नृत्यप्रकारात परीक्षकांची मनं जिंकली होती. या दिवसासाठी मी खूप मेहनत घेतली आणि आता ट्रॉफी जिंकल्यावर मला खूप आनंद झाला आहे, अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

Web Title :- India’s Best Dancer 2 Winner | saumya kamble wins indias best dancer season 2

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचं ट्वीट; म्हणाले – ‘या बातम्या खोट्या आहेत, शिवसेना पक्षात फक्त…’

 

Google Chrome | सरकारचा Alert! ताबडतोब अपडेट करा Google Chrome ब्राउजर, अन्यथा होईल मोठे नुकसान

 

Post Office Gram Suraksha Yojana | केवळ 50 रुपये जमा करा, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ सुपरहिट स्कीमध्ये मिळतील 35 लाख; जाणून घ्या सविस्तर