देशात ‘कोरोना’चा हाहाकार, मात्र आरोग्य मंत्रालयानं केला हा मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला असून, जगात १ लाख संख्या असलेल्या १० देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. त्यामुळेच सगळीकडे चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, त्यावरती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे. देशात रुग्णांच्या वाढत्या संख्येवर पूर्णरीत्या नियंत्रण असून, रुग्णांवर उपचार करण्याची पूर्ण क्षमता आपल्याकडे असल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

त्यांनी बोलताना म्हटलं की, अतिशय उच्च स्तरावर याची देखरेख केली जात आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यावरती आमचं लक्ष आहे. जगातील १० देशांमध्ये भारतापेक्षा जास्त संसर्गित केसेस आहेत. ‘जागतिक पातळीवर प्रति १ लाख लोकसंख्येमागे मध्ये ६२ लोक संसर्गित होत असून, भारतात प्रति लाख लोकसंख्येमागे फक्त ७.९ लोकांनाच याचा संसर्ग झाला. तर, त्या देशांमध्ये ८३ टक्के अधिक मृत्यू होत असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.

तसेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ३९.६२ टक्के असल्याचं त्यांनी सांगितलं
दरम्यान, कोरोना संसर्गित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहातून संसर्ग पसरण्याचा भीतीने अनेक ठिकाणी कोरोना संसर्गित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू दिलं जात नाही. मात्र, खरचं कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्या रुग्णाच्या शरीरामार्फत संसर्ग पसरण्याचा धोका आहे का? मृतदेहावरती संसर्ग किती काळ राहतो? याबाबत इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) ने महत्वाची माहिती दिली आहे.

याबाबत, आयसीएमआरला ने सांगितलं की, कोरोना संसर्गित रुग्णाच्या मृत शरीरातून संसर्ग हळूहळू कमी होतो. मात्र, त्यासाठी किती कालावधी लागतो, तो पूर्णपणे कधी नष्ट होतो याचा कालावधी निश्चित माहिती नाही. त्यामुळे मृतदेहाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी आवश्यक ती सर्व काळजी हवी. असं त्यांनी म्हणलं.