देशातील पहिलं ‘मोबाइल व्यसनमुक्ती केंद्र’ सुरू !

प्रयागराज : वृत्तसंस्था – मोबाईल हा सध्याच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईलचा वापर होतो. सकाळ पासून संध्याकाळ पर्य़ंत मोबाईलवर काहीना काही करत असलेली माणसं आपल्या आजूबाजूला वारत असतात. मात्र, मोबाईलच्या अतिवापरामुळे मोबाईलचे एकप्रकारचे व्यसनच जडते. मोबाईलच्या वेडापाई अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. तर कित्येकजण कायमस्वरुपी जखमी झाले आहेत. व्यसन सोडवण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र असते तसेच मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी आता मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरु झाले आहे. विशेष म्हणजे या केंद्रामध्ये पहिल्याच दिवशी १५ जण उपचारासाठी दाखल झाले आहेत.

मोबाईल व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू विभागीय रुग्णालयात करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये मोबाईल गेम, इंटरनेट, टीव्ही आणि सोशल मीडीयाची लागलेली सवय उपचाराने सोडवली जाणार आहे. मनोरुग्ण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांच्या वागणुकीत आणि त्यांच्या होणाऱ्या बदलला मोबाईलचे व्यसन आणि इंटरनेट हे मुख्यत्वे कारणीभूत आहे. त्यामुळे या केंद्राची स्थापना करण्यात आली असून पहिल्याच दिवशी १५ जण उपचारासाठी दाखल झाले आहेत. दाखल झालेल्यांमध्ये जास्तकरून विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

डॉक्टरांचे एक पथक यावर बऱ्याच दिवसांपासून काम करत होते. त्यानंतर हे केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती डॉ. राकेश पासवान यांनी दिली. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना औषधासोबतच योग्य सल्ला देण्यात आला आहे. तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. दाखल झालेल्या रुग्णांमध्ये जास्त करून विद्यार्थी आहेत. या केंद्रामार्फत मोबाईलचे व्यसन आणि इंटरनेचे व्यसन सोडण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे डॉ. पासवान यांनी सांगितले.

मोबाईलचे व्यसन फक्त तरुण मुलां-मुलींमध्ये नाही तर ते वृद्ध व्यक्तींना देखील आहे. या व्यसनामुळे वृद्ध व्यक्तीच्या मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होत असल्याचे डॉक्टर ईशान्या यांनी सांगितले. हे व्यसनमुक्ती केंद्र सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सुरु राहणार आहे

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

Loading...
You might also like