खुशखबर! पुण्यात गर्भप्रत्यारोपण केलेल्या महिलेने दिला मुलीला जन्म

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गर्भ प्रत्यारोपण केलेल्या देशातील पहिल्या महिलेने दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला. ही ऐतिहासिक घटना गुरुवारी रात्री पुण्यात घडली आहे. पुण्याच्या गॅलेक्सी केअर रुग्णालयातील डॉ. शैलेश पुणतांबेकर आणि त्यांच्या टीमने कामगिरी यशस्वीपणे पार पाडली आहे. गॅलॅक्‍सी केअर रुग्णालयात १८ मे २०१७ रोजी करण्यात आले होते. गुजरातमधील वडोदरा येथे राहणाऱ्या संबंधित महिलेला तिच्या ५२ वर्षीय आईने गर्भाशय दान केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1405edab-d28b-11e8-a235-374a71e70c25′]

पुण्यातील गॅलेक्सी लॅप्रोस्कोपिक इन्स्टिट्यूटचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या पथकाने हे प्रत्यारोपण केले होते. त्यानंतर गेले सात महिन्यांपासून या महिलेवर या रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. याबाबत डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, गर्भवती महिलेचा रक्तदाब वाढल्याने आम्हाला सिझेरियन करून प्रसूती करावी लागली. या प्रसूतीसाठी लॅप्रोस्कोपी पद्धतीचा वापर करण्यात आला. मुलीचे वजन १.४५० किलोग्रॅम आहे आणि आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. प्रत्यारोपण केलेल्या गर्भाशयातून मुलीचा जन्म झाल्याने आम्हाला खूप आनंद होतो आहे. प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून जन्म घेणारे हे देशातील पहिले बाळ ठरले आहे. जगभरामध्ये आतापर्यंत प्रत्यारोपित गर्भाशयातून ११ बाळांचा जन्म झाला आहे. त्यामुळे या पद्धतीने जगात येणारे हे १२ वे बाळ आहे.

[amazon_link asins=’B07BSZHSKN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b216393-d28b-11e8-ba08-cf12d1147dee’]

वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत गर्भाशय दान करता येतो. मात्र, ५२ व्या वर्षी गर्भाशय दान करणाऱ्या या महिलेची रजोनिवृत्ती झाली होती. त्यामुळे त्यांचे गर्भाशय व्यवस्थित कार्यान्वित आहे का, हे तपासण्यासाठी त्यांना औषधे देऊन मासिक पाळी आणण्यात आली. त्यातून गर्भाशय कार्यान्वित असल्याचे निदान झाले. त्यानंतर गर्भाशय दान करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे डॉ. पुणतांबेकर यांनी सांगितले.

आज शिवसेनेचे मुंबईत तर पंकजा मुंडेंचे बीडमध्ये शक्तीप्रदर्शन

You might also like