India’s GDP | भारताच्या GDP मध्ये 2050 पर्यंत होईल 406 अरब डॉलरची वाढ, 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना मिळेल नोकरी; जाणून घ्या

नवी दिल्ली : भारताच्या जीडीपी (India’s GDP) मध्ये 2050 पर्यंत 406 अरब डॉलरची वाढ होईल आणि 4 कोटी 30 लाख नवीन नोकर्‍या तयार होतील. ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशन (Observer Research Foundation – ORF) ने आपल्या रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी अलिकडेच 2021 च्या जलवायु परिवर्तन संमेलनात, सीओपी-26 (COP-26) मध्ये भारतासाठी 2070 पर्यंत शुद्ध-शून्य उत्सर्जन लक्ष्याची घोषणा केली होती. (India’s GDP)

भारत 2030 पर्यंत कमी कार्बन उत्सर्जनाची आपली विद्युत क्षमता 500 गीगावॉट पर्यंत वाढवणे आणि 2030 पर्यंत नूतनीकरण उर्जेतून आपली उर्जा गरजांच्या 50 टक्के पूर्ण करण्याचे लक्ष्य कायम ठेवले आहे.

ओआरएफने एका वक्तव्यात म्हटले आहे की, भारताचे 2070 चे शुद्ध-शून्य कार्बन उत्सर्जन लक्ष्य महत्वपूर्ण आणि कौतूकास्पद आहे, परंतु हे अतिशय महत्वकांक्षी सुद्धा आहे. शेपिंग आवर ग्रीन फ्यूचर : पाथवे अँड पॉलिसी फॉर अ नेट-झीरो ट्रान्सफॉर्मेशन’ रिपोर्टमध्ये स्थिरता आणि विकासाच्या दुहेरी लक्ष्यांना संतुलित करत या बदलाकडे जाण्यासाठी आवश्यक संरचानात्मक परिवर्तन आणि वेगवर्धक कारकांबाबत सांगितले आहे.

ZS पुढील वर्षी 4,000 पेक्षा जास्त नवीन भरती करणार

व्यावसायिक सेवा देणारी जागतिक कंपनी झेडएसने पुढील वर्षी 4,000 पेक्षा जास्त नवीन कर्मचार्‍यांची भरती करण्याची योजना बनवली आहे.
झेडएसने गुरूवातील एका वक्तव्यात म्हटले की, ते 2022 मध्ये 4,000 पेक्षा जास्त लोकांना प्रमुख क्षेत्रांत नियुक्त करण्यासाठी इच्छुक आहेत.

ही भरती कंपनीच्या बेंगळुरू, पुणे आणि गुरुग्राम येथील कार्यालयासाठी होईल.
एका वक्तव्यानुसार नवीन पद परामर्श, व्यवसाय संचालन, व्यवसाय तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेयर विकास सारख्या प्रमुख क्षेत्रातून होईल.
झेडएस सध्या भारतात 8,500 पेक्षा जास्त लोकांना रोजगार देत आहे. (India’s GDP)

हे देखील वाचा

Hybrid Fund | ‘हायब्रिड फंड’ कशाला म्हणतात, जाणून घ्या त्यामधील गुंतवणुकीचे फायदे?

Sangli News | एकरकमी FRP चे आंदोलन सांगली जिल्ह्यात हिसंक वळणावर; राजारामबापू, क्रांती साखर कारखान्यांचे ट्रॅक्टर पेटविले

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : India’s GDP | india gdp to rise by usd 406 billion by 2050 more than 40 million people will get jobs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update