Coronavirus Impact : एप्रिलमध्ये भारतात सर्वात कमी सोन्याची खरेदी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी एप्रिल महिन्यात देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये विमान सेवा आणि दागिन्यांची दुकाने बंद पडल्यामुळे भारतात सोन्याची आयात 99.5 टक्क्यांनी घसरली आहे. हे गेल्या तीन दशकातील सर्वात कमी घट आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, एप्रिलमध्ये भारतात केवळ 50 किलो सोन्याची आयात करण्यात आली आहे. ही माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. एप्रिलमध्ये लग्नाचा सीजन आणि अक्षय तृतीयामुळे सोन्याला मोठी मागणी असते.

भारत हा जगातील सोन्याची आयात करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. परंतु एप्रिल 2020 मध्ये देशात फक्त 50 किलो सोन्याची आयात करण्यात आली. गेल्या वर्षी याच काळात 110.18 टन सोन्याची आयात झाली होती. किंमतीच्या दृष्टीने एप्रिल महिन्यात सोन्याची आयात घटून ती 2.84 मिलियन डॉलर्सवर पोहचली आहे.

लॉकडाउनचा परिणाम

किंमतीच्या आधारे एप्रिलमध्ये सोन्याची आयात घटून ती 2.84 मिलियन डॉलर्सवर गेली, जी एका वर्षापूर्वी 3.97 मिलियन डॉलर होती. एप्रिलमधील लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे अनेक उद्योग बंद राहिले. भारतातील बहुतेक सोन्यांची आयात हवाई मार्गाने केली जाते, परंतु विमान उद्योग पूर्णपणे बंद पडल्यामुळे याचे नुकसान झाले आहे.

21 मार्चपासून देशात सराफा बाजार – देशात 54 दिवस लॉकडाउन सुरू आहे. 21 मार्चपासून देशातील 130 कोटी लोकसंख्या घरातच बंद आहे. लॉकडाऊनमध्ये सराफा बाजारही बंद आहे. त्याचबरोबर लग्नाचे आयोजनही पुढे ढकलले जात आहेत अशा परिस्थितीत सोन्याच्या मागणीत मोठी घट झाली असून त्याचा परिणाम सोन्याच्या आयातीवर झाला आहे. भारत सोन्याची आयात करणार्‍या मुख्य देशांपैकी एक आहे. या प्रकरणात तो दुसरा क्रमांक आहे. सोन्याचा वापरही इथे खूप जास्त प्रमाणात केला जातो.