PM Modi : मोदी करणार आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या रेल्वे-रस्ते पुलाचे उद्घाटन

आसाम : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाअखेर देशातील सर्वात लांब रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत. आसामच्या दिब्रूगड ते अरुणाचल प्रदेशातील पासीघाट दरम्यान हा सर्वात लांब रेल पूल आहे.

”या वर्षीच्या जुलै पर्यंत सर्व बांधकाम, रेल्वे सिग्नल्सचे काम पूर्ण होईल. 4.94 किमी असेल असे,”मुख्य कार्यकारी अभियंता महेंद्र सिंग यांनी सांगितले. बोगीबील या पुलाची खासियत म्हणजे हा पूल आशियातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा पूल असणार आहे.

या पुलाखालून ब्रह्मपुत्रासारखी सतत मार्ग बदलणारी नदी वाहते. ब्रह्मपुत्रेच्या पातळीपेक्षा 32 मीटर उंच हा पूल आहे. हा पूल म्हणजे ईशान्य भारतातील विकासाचे प्रतीक असेल असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या पुलाची संकल्पना स्वीडन आणि डेन्मार्क दरम्यान असलेल्या पुलावरून घेण्यात आले आहे.

बोगीबील पुलाच्यावर तीनपदरी रस्ता आणि त्याच्यावर दुहेरी रेल्वे महामार्ग असणार आहे. अरुणाचल प्रदेश सारख्या डोंगराळ भागात रेल्वे पोहोचविण्यात सरकारला यश येईल असे म्हणायला हरकत नाही.