#ISSF World Cup 2019 : मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांचा सुवर्णभेद 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेमबाजी विश्वचषकात भारताने आज सुवर्णपदकाने आज सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. विश्वचषकातील मिश्र दुहेरी गटामध्ये भारताच्या मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. या विश्वचषकात एकूण तीन सुवर्णपदक भारताच्या खात्यात जमा झाली आहेत.

नेमबाजी विश्वचषकात भारतीय नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १० मी. एअर पिस्तुल (मिश्र) प्रकारात भारताच्या मनू भाकेर आणि सौरभ चौधरी जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत भारतीय जोडीने चीन आणि जपानच्या खेळाडूंवर मात  केली. विश्वचषकाला सुरुवात झाल्यांनंतर अपुर्वी चंदेला आणि सौरभ चौधरी यांनी पहिल्या दोन दिवसांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती.

सौरभ हा चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. या विश्वचषकातील त्याचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. सौरभ चौधरीने रविवारी आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. सौरभला या कामगिरीमुळे २०२० टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेतील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. सौरभची कामगिरी इतकी चांगली होती की त्याने शेवटचा नेम धरण्यापूर्वीच सुवर्णपदक निश्चित केले होते. त्यानंतर अखेरच्या प्रयत्नात सौरभने विश्वविक्रम त्याच्या नावे नोंदवला.

ttps://twitter.com/ANI/status/1100700570409713665