इंडियाज मोस्ट वाँटेड चा निवेदक सुहैब इलियासीची पत्नीच्या हत्येप्रकरणी निर्दोष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंडियाज मोस्ट वॉन्टेड या क्राईम शोचा निवेदक सुहैब इलियासीला दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिला आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या इलियासीला दिल्ली हायकोर्टाने दोषमुक्त केले आहे. १८ वर्षांपूर्वी इलियासीने पत्नीची हत्या केल्याचा आरोप झाला होता. त्या खटल्यात इलियासी याला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4adee637-c879-11e8-b037-7379b887f70f’]
जानेवारी २००० मध्ये सुहेब इलियासीची पत्नी अंजूचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुहेबविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदनात अंजूने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र, संपूर्ण प्रकरणातील विसंगती लक्षात घेता पोलिसांनी सुहेबविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. ६ सप्टेंबर, २००४ मध्ये या प्रकरणात हत्येच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने खटला सुरु झाला.
इलियासीचे गैरव्यवहार, पैशांची अफरातफर आणि काही अवैध धंदे याविषयी अंजूला पूर्ण कल्पना होती. किंबहुना त्याने ही सर्व चुकीची कामे थांबवावीत अशी तिची इच्छा होती. आपल्या बाळासह ती कॅनडाला स्थायिक होऊ इच्छित होती. यातूनच त्याने ही हत्या केल्याचा पोलिसांचा दावा होता. दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने डिसेंबर २०१७ रोजी या प्रकरणात इलियासीला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
[amazon_link asins=’B011L670T0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6084481f-c879-11e8-ba5f-0da68ca8a6a9′]
न्यायालयाच्या निर्णयाला इलियासीने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते. शुक्रवारी दिल्ली हायकोर्टाने या याचिकेवर निर्णय दिला. हायकोर्टाने इलियासीला या प्रकरणातून दोषमुक्त केले आहे. १९८८ मध्ये क्राइम शो सुरु केल्यानंतर सुहेब इलियासी टिव्ही क्षेत्रातील चर्चित चेहरा बनला होता. या शोमुळे सुहेब प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. मात्र, हत्या प्रकरणामुळे त्याचे स्टारडम उतरणीला लागले होते आणि तो प्रसिद्धीच्या झोतापासून बाजूला गेला होता.