‘जीरो’ ते ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेडपर्यंत’, वादविवादामध्ये आले होते हे ‘६’ चित्रपट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे चित्रपट नेहमी आपल्या कंटेड, सीन किंवा कोणत्यानकोणत्या कारणाने लोकांच्या भावना दुखावत असतात. अनेकदा चित्रपटांना कायदेशीर नोटिसांचा देखील सामना करावा लागला आहे. अशामध्ये चित्रपट निर्माताला मजबूरीमध्ये चित्रपटातील सीन किंवा डायलॉग कट करावे लागतात.

शाहरुख खानचा चित्रपट ‘जीरो’ मागच्या वर्षी प्रदर्शित झाला होता. जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तेव्हा एक सीनमध्ये शाहरुख खानने हातात छोटी तलवार घेतली होती. यानंतर हा चित्रपट वादविवादामध्ये सापडला होता. सिख समाजाने यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. वादामुळे या चित्रपटातील सीनला काढून टाकले गेले होते.

नुकताच प्रदर्शित झालेला अभिनेता अर्जुन कपूरचा चित्रपट ‘इंडियाज़ मोस्ट वान्टेड’ मधील एका सीनमुळे खूप वाद झाला होता. चित्रपटामध्ये एक आतंकवादी पवित्र गीताची एक लाईन बोलताना दिसला. यावर सेंसर बोर्डने आपत्ती व्यक्त केली होती. यानंतर निर्मात्याने चित्रपटातील सीनला हटवले होते.

सलमान खानचे मेहूणे आयुष शर्माने ‘लवयात्री’ चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये पदापर्ण केले होते. पहिल्या चित्रपटाचे टायटल ‘लवरात्रि’ होते जे हिंदू समाजाला पसंत पडले नाही. विश्व हिंदू परिषदने नवरात्री सनाचा अपमान केला ,असे सांगितले होते. या व्यतिरिक्त बिहारच्या एका वकीलाने नवरात्री सनाचा अपमान केल्याबद्दल आरोप लावून चित्रपट निर्मात्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. वाद इतका वाढला की, या चित्रपटाचे टायटल ‘लवरात्रि’ काढून ‘लवयात्री’ केले.

अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने ‘केदारनाथ’ चित्रपटामधून पदार्पण केले होते. चित्रपटामध्ये सुशांत राजपूतने एक मुस्लिम मुलाची व साराने एक हिंदू मुलीची भूमिका साकारली होती. चित्रपटावर ‘लव जिहाद’ चा प्रचार करण्याचा आरोप लावला होता. यामुळे चित्रपटाला उत्तराखंडसोबत सात जिल्ह्यामध्ये बॅन केले होते.

अभिनेता जॉन अब्राहमचा चित्रपट ‘सत्यमेव जयते’ मध्ये एका सीनवर वाद झाला होता. चित्रपटामधील एक सीनमध्ये मुहर्रमच्या जुलूसमध्ये मातमच्यावेळी जॉनचा मृत्यू झाल्याचे दाखविले होते. यावर सिया कम्युनिटी मेंबर्सने नाराजगी व्यक्त केली होती.

अनुराग कश्यपच्या निर्देशनमध्ये बनला गेलेला रोमॅटिंक ‘मनमर्जियां’ चित्रपटाला सिख समाजाच्या रागाचा सामना करावा लागला. या चित्रपटामध्ये अभिनेता अभिषेक बच्चनने एका सिख व्यक्तीची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये अभिषेक आपली पगडी उतरवून सिगारेट पिताना दिसून आला होता. हा सीन सिख समाजाला पसंत पडला नाही. यामुळे या सीनला हटविले गेले होते.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक