वॉरियर ड्रोन : भविष्यातील योद्धा जो भारतासाठी हवाई युद्धाचे पालटणार चित्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या मेगा एअर शो एयरो इंडियामध्ये सर्व देशी-विदेशी कंपन्या आपले विमान प्रदर्शित करत आहेत. भारतीय वायुसेनेला आकर्षित करणे हे त्यांचे मुख्य उद्दीष्ट आहे जेणेकरून संभाव्य खरेदीदार म्हणून प्रभाव पडला जाऊ शकेल. पण या एयरो इंडिया शोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे भारतात बनविलेले सेमी-स्टिल्ट ड्रोन, जे भविष्यातील आकाश युद्धाचे सर्वात महत्त्वाचे शस्त्र असेल. मात्र, त्याचा विकास करण्याचे काम अद्याप सुरू असून एयरो इंडियामध्ये त्याची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.

या सेमी-स्टेल्थ ड्रोनला वॉरियर असे नाव देण्यात आले आहे, जे स्वदेशी शस्त्रे बनविण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. याला CATS किंवा कॉम्बॅट एअर टीमिंग सिस्टम म्हंटले जाते. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे मनुष्यासह (पायलट) आणि मानव रहित या दोन्ही प्लॅटफॉर्म द्वारे ऑपरेट केले जाऊ शकते. याला पूर्ण स्वदेशी फायटरजेट तेजससह रणांगणात उतरविण्याची तयारी केली जात आहे. या ड्रोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शत्रूच्या हवाई हद्दीत तेजसच्या लढाऊ पायलटबरोबर सुरक्षेच्या जबरदस्त व्यवस्थेतही मिशन फत्ते करते. अर्थात वॉरियर ड्रोन भारतीय वायुसेनेच्या वैमानिकाने उड्डाण केलेल्या तेजस लढाऊ विमानासह ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केले आहे. यामुळे रणांगणात संरक्षण आणि आक्रमण दोन्ही एकाच वेळी होईल. हवाई युद्धात ड्रोन महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

दरम्यान, वॉरियर ड्रोन तीन ते पाच वर्षांत उड्डाण करण्याची शक्यता आहे आणि हे बनविण्याचा खर्च हिंदुस्तान एयरोनॉटिक्स (एचएएल) कंपनी उचलणार आहे. यावर काम करणाऱ्या तज्ञाने सांगितले की, हे ड्रोन असा योद्धा असेल, ज्याला तेजस लढाऊ विमानाकडून सर्व कमांड मिळतील. ते म्हणाले की, हे ड्रोन प्रत्येक अभियानाची कार्यक्षमता वाढवेल तसेच वायुसेनेच्या सैनिक पायलटांचा मृत्यू होण्याचा धोकाही कमी करेल. तज्ञाच्या म्हणण्यानुसार हे ड्रोन युद्धक्षेत्रातील पायलटचे रक्षक असतील तर शत्रूंचे भक्षक असतील.

वॉरियर ड्रोन हे एअर-टू-एअर आणि एअर-टू-ग्राऊंड क्षेपणास्त्रांसह सुसज्ज आहेत. याचा उपयोग जमिनीवर किंवा हवेत मारण्यासाठी होईल. वॉरियरला शत्रू आपल्या सर्व्हिलन्स सिस्टीम आणि रडारद्वारे देखील पकडू शकत नाही. त्यामुळे हे इतर ड्रोन्सपेक्षा वेगळे आहे. हेच कारण आहे की याला शत्रू देशासाठी नेहमीच आव्हान असणार्‍या ‘लो ऑब्जर्वेबल ‘ प्रकारात ठेवले गेले आहे.