सावधान ! चीनी हॅकर्सच्या निशाण्यावर आहे भारताचा विद्युत पुरवठा, गेल्यावर्षी मुंबईत ‘बत्ती’गुल करून दाखवला होता ट्रेलर

नवी दिल्ली : भारत आणि चीन या दोन्ही देशांतील तणाव असल्याचे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. त्यानंतर आता चीनने भारतावर ‘डोळा’ ठेवला आहे. चीनी हॅकर्सच्या निशाण्यावर भारताचा वीज पुरवठा (पॉवर सप्लाय) आहे. याबाबतचा दावा एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे. या रिपोर्टनंतर ही माहिती समोर आली आहे. तसेच काही सरकारी यंत्रणाही रडारवर असल्याचे सांगितले जात आहे.

भारत सरकारच्या माध्यमातून सुरु झालेल्या किमान 12 संस्था चीनी हॅकर्सच्या निशाण्यावर होत्या. यामध्ये मुख्यत्वे करून पॉवर युटिलिटी आणि त्यांचे डिस्पॅच सेंटर्सचा समावेश आहे. 2020 दरम्यान चीनी सरकारच्या समर्थन असलेल्या समूहांनी मालवेअर इंजेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या चीनच्या हॅकर्सचा प्रयत्न होता, की भारतात मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा खंडीत करणे.

काही सरकारी आणि संरक्षण संघटनाही रडारवर

या हॅकर्सचे काही समूह राज्य सुरक्षा मंत्रालय (MSS) किंवा चीनच्या मुख्य गुप्तचर आणि सुरक्षा एजन्सी, चीनची पिपल्स लिबरेशन आर्मीसह (PLA) जोडले आहेत. या हॅकर्सच्या रडावर वीज क्षेत्राशिवाय अनेक सरकारी आणि संरक्षण संघटनाही होत्या.

गेल्या वर्षी मुंबईत अनेक तास नव्हती वीज

गेल्या वर्षी मुंबईत काही तासांपर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे जवळपास दोन तास मुंबई स्टॉक एक्सचेंज बंद होता. तर अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. याशिवाय मुंबई, ठाणे आणि मावीच्या काही कार्यालयही बंद करण्यात आले होते. हा ट्रेलर असल्याचे सांगण्यात येत आहे.