‘हे’ आहेत भारतातील 5 सुपर ‘रिच’ भिकारी, कोट्यावधीमध्ये संपत्ती अन् फ्लॅट-रोकड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील प्रत्येक माणूस आपल्या कुटुंबासाठी काही ना काही काम किंवा एखादा नोकरी करतो आणि त्यातून पैसे कमवतो. मात्र, बऱ्याचदा कितीही काम केले तरी आपली म्हणावी तशी बचत होत नाही. मात्र, असे काही भिकारी आहेत जे आपल्या सर्वसामान्यांपेक्षा जास्त पैसे कमवतात, हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल. भारतात असे 5 सुपर – रिच भिकारी आहेत. ज्यांचे अपार्टमेंटमध्ये फ्लॅट्स आहेत, बरीच मालमत्ता आहेत आणि मोठ्या बँकेत शिल्लक आहेत. पण तरीही, ते रस्त्यावर भीक मागतात.

देशातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीमध्ये भारत जैनचे नाव पहिल्या क्रमांवर आहे. मुंबईच्या परळ भागात तो भीक मागतो. त्याच्याकडे मोठ्या अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट आहेत, ज्यांची किंमत प्रत्येक फ्लॅटसाठी 70 लाख रुपये आहे. म्हणजेच त्याच्याकडे एक कोटी 40 लाखांची मालमत्ता आहे. तो दरमहा सुमारे 75,000 भीक मागतो, जे भारतात नोकरी करणार्‍या व्यक्तीच्या पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.

श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीत कोलकत्ताची लक्ष्मी दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्ष्मीने 1964 पासून कोलकातामध्ये वयाच्या 16 व्या वर्षी भीक मागण्यास सुरुवात केली आणि 50 पेक्षा अधिक वर्षांच्या आयुष्यात तिने भीक मागून लाखो रुपये जमा केले आहे. तिचे सर्व पैसे बँकांमध्ये जमा आहेत. भीक मागून लक्ष्मी अजूनही दररोज 1 हजार रुपये कमावते. महिन्याच्या हिशेबाने विचार केला असता ती दरमहा किमान 30 हजार रुपये कमावते.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मुंबईत राहणाऱ्या गीताचे नाव येते. गीता मुंबईतील चर्नी रोडजवळ भीक मागते आणि त्या पैशातून तिने एक फ्लॅट खरेदी केला आहे ज्यात ती आपल्या भावासोबत राहते. भीक मागून ती दिवसाला सुमारे 1,500 रुपये मिळवते. एका महिन्यात तिचे उत्पन्न सुमारे 45 हजार रुपये आहे.

अहवालानुसार, भीक मागून जगणाऱ्या चंद्र आझादजवळ गोवंडीमध्ये घर, 8.77 लाख रुपये बँक खात्यात जमा आहे आणि जवळपास 1.5 लाख रुपये रोकड जमा आहे. 2019 मध्ये रेल्वे अपघातात प्राण गमावल्यानंतर तिची सर्व मालमत्ता मुंबई पोलिसांना शोधून काढली.

या अहवालानुसार, बिहारच्या पाटण्यातील रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागणार्‍या पप्पूचासुद्धा श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. अपघातात पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर पप्पूने पाटण्याच्या रेल्वे स्थानकांवर भीक मागण्यास सुरवात केली. अहवालानुसार पप्पू कुमारकडे सुमारे 1.25 कोटींची संपत्ती आहे.