Coronavirus : ‘कोरोना’वरून लोकांचे टोमणे, ‘इंडिगो’ची क्रू मेंबर ‘ढसा-ढसा’ रडली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – देशातील जनता कोरोना व्हायरसला युद्धस्तरावर लढा देत आहे. एकीकडे, असे लोक आहेत जे कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी काम करत आहेत. जसे की, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील कामगार, विमानतळावरील कर्मचारी, सफाई कामगार आणि पोलिस असे बरेच लोक आहेत जे लोकांच्या भल्यासाठी काम करत आहेत. दुसरीकडे, असे काही लोक आहेत जे या सर्व लोकांना प्रोत्साहित करण्याऐवजी त्यांच्यावर टीका करत आहे.

इंडिगोच्या क्रूची महिला सदस्यने एक व्हिडिओ शेअर करुन सांगितले की, लोक तिच्या कुटुंबाला कशी वागणूक देत आहे. कोलकाताची रहिवासी असलेल्या अमृता शाहने एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती रडून सांगत आहे की, तिच्यामुळे लोक तिच्या परिवाराला वाईट बोलत आहे.

ती म्हणाली की, माझ्या घरात मी आणि माझी आई आम्ही दोघीच राहतो. मी कामावर गेल्यावर, आजूबाजूचे लोक घरी येऊन माझ्या आईला वाईट बोलतात. तुमच्या मुलीला कोरोना झाला आहे. तुम्ही देखील कोरोनाबाधित असू शकता तुम्ही लोक कोरोना पसरवत आहेत, असे म्हणून दुकानदार त्यांना सामान देण्यासही नकार देत आहेत. ती म्हणाले की, पोलिससुद्धा त्यांना मदत करत नाहीत.