इंडिगो परत करणार रद्द केलेल्या उड्डाणांचे पैसे; 31 जानेवारीपर्यंत अकाऊंटमध्ये होईल जमा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणू दरम्यान अनेक प्रवाशांनी लॉकडाउनमध्ये तिकिटे बुक केली होती. कंपनीने या सर्व प्रवाशांचे पैसे 31 जानेवारी 2021 पर्यंत परत करण्याची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लावल्यामुळे यावर्षी ही उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यानंतर एअरलाइन्सने रद्द झालेल्या तिकिटांवर ‘क्रेडिट शेल’ तयार केले. क्रेडिट शेलचा वापर त्याच प्रवाशाद्वारे भविष्यातील प्रवासासाठी बुक करण्यासाठी केला जाऊ शकतो.

एअरलाइनने सोमवारी दिली माहिती

सोमवारी एअरलाइन्सने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या परताव्याशी संबंधित काम पूर्ण केले आहे. प्रवाशांना परत करण्यात आलेली ही रक्कम सुमारे 90 टक्के आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही माहिती दिली. इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रोंजॉय दत्ता म्हणाले की, लॉकडाउनमुळे मार्चच्या उत्तरार्धात एअरलाइन्स पूर्ण थांबली होती. आमच्याकडे रोख प्रवाह थांबविण्यात आला असल्याने आम्ही प्रवाशांचे पैसे परत करू शकलो नाही.

यासह दत्ता म्हणाले की, आता ऑपरेशन सुरू झाल्यानंतर आणि विमान प्रवासाच्या मागणीमध्ये हळूहळू सुधारणा झाल्यानंतर आमचे प्राधान्य रद्द केलेल्या उड्डाणांच्या प्रवाशांचे पैसे परत करणे आहे. दत्ता म्हणाले, “आम्ही 31 जानेवारी 2021 पर्यंत 100 टक्के क्रेडिट शेल भरू.”

दरम्यान, कोरोना लॉकडाउन दरम्यान, परदेशात अडकलेल्या प्रवाशांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन सुरू करण्यात आले आणि अनेक देशांशी हवाई बबल करारांवरही स्वाक्षरी झाली. कोरोना विषाणूच्या साथीमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अनुसूचित आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक उड्डाणे वाहतुकीवरील बंदी 31 डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. यापूर्वी 30 नोव्हेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंदी घालण्यात आली होती. माात्र, वंंदे भारत मिशन अंतर्गत जाणारी उड्डाणे यादरम्यान सुरू राहतील.