…तर सोनिया नाही ‘ही’ असती गांधी घराण्याची सून

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था

बॉलिवूड आणि राजकारणी यांच्यातील नाते  संबंधाच्या  चर्चा आपण नेहमीच  ऐकतो. राजकारणातील प्रसिद्ध गांधी घराणेही त्यापासून दूर राहिलेलं नाही. गांधी-नेहरू कुटुंबाचे तर राज कपूर यांच्या कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राज कपूर यांच्या मुलीला घरात सून म्हणून आणायचे होते. ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांनी ‘नेता-अभिनेता: बॉलिवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स’ या पुस्तकात हा गौप्यस्फोट केला आहे. इंदिरा गांधी यांना राज कपूर यांची मोठी मुलगी ऋतूशी राजीव गांधी यांचा विवाह लावून द्यायचा होता, असं या पुस्तकात म्हटलं आहे.

पुस्तकातील माहितीनुसार, इंदिरा गांधींना वाटत होतं की, दोन्ही कुटुंबीयांमधील संबंध पुढे जावेत. त्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं लग्न राज कपूर यांची मोठी मुलगी ऋतूशी करण्याची इंदिरा गांधींची इच्छा  होती. रशीद यांनी पुस्तकात लिहलं आहे की , असं नव्हे की इंदिरा गांधींना बॉलिवूड क्षेत्रातली सून हवी होती. बॉलिवूडशी संबंधित सून किंवा बॉलिवूडच्या झगमगाटाशी इंदिरा गांधी यांना काहीही घेणंदेणं नव्हतं. त्यांना राज कपूर यांच्याविषयी आदर होता. त्यामुळेच त्यांना कपूर घराण्याशी कौटुंबीक संबंध निर्माण करायचे होते.  राज कपूर यांच्या मुलीशी राजीव गांधींचं लग्न लावून देण्याची इंदिरा गांधींची इच्छा काही पूर्ण झाली नाही. राजीव गांधी उच्च शिक्षणाच्या निमित्तानं जेव्हा ब्रिटेनला गेले तेव्हा केंब्रिज विद्यापीठात त्यांची ओळख सोनिया गांधींशी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले आणि त्यांनी १९६८ मध्ये लग्न केलं.

[amazon_link asins=’B07C2ZW7ZB,B078LVWLJX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4592809c-c54e-11e8-8dd2-816782c818c4′]

राज कपूर यांची नात करिना कपूरनेही २००२ मध्ये राहुल गांधी तिला आवडत असल्याचं म्हटलं होतं. विशेष म्हणजे राहुल सुद्धा करिनाचा आलेला प्रत्येक चित्रपट फर्स्ट डे, फर्स्ट शो पाह्यचे, असंही या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.

जाहिरात