कोमॉर्बिड असलेल्या व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक; डॉक्टरांनी दिला इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाव्हायरस तसेच इतर संसर्गामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू नये याकरिता कोमॉर्बिड व्यक्तींनी दर 3 महिन्यांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांनी अशा व्यक्तींना आवाहन करत आपल्या आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष न करण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. इतकेच नव्हे तर अशा व्यक्तींनी संतुलित आहाराचे सेवन करणे, नियमित व्यायाम करणे आणि तणावमुक्त आणि आरोग्यदायी जीवनशैली स्विकारणे गरजेचे आहे.

शारिरीक आणि मानसिक अशाप्रकारच्या अनेक कोमॉर्बिडिटीज असलेले लोक एलर्जी आणि संसर्गाशी लढण्यास सर्वसामान्यांइतके सक्षम नसतात. निरोगी लोकांच्या तुलनेत या व्यक्ती अनेक रोगांनी वेगाने वेढलेले असतात. भारत सरकारने कोविड १९ संसर्गाचा प्रसार रोखण्याकरिता करण्यासाठी राष्ट्रव्यापी लॉकडाउन आणि कडक नियमावली जाहिर केली आहे. ज्यामध्ये मास्कचा वापर करणे, मुखवटा घालणे, सोशल डिस्टंसचे पालन करणे, हातांची स्वच्छता राखणे यासारख्या कठोर उपाययोजना केल्या आहेत.

मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाची समस्या, मूत्रपिंडाचा रोग आणि तीव्र अडथळा आणणारा फुफ्फुसीय रोग (सीओपीडी) यासारख्या वृद्ध व्यक्ती आणि प्रौढ व्यक्तींमध्ये कोविड संसर्गाचा धोका जास्त असतो. वेळीच काळजी न घेतल्यास इतर आरोग्याच्या समस्या जसे मूत्रपिंड किंवा फुफ्फुसातील बिघाड किंवा यकृत खराब होण्याची शक्यता देखील उद्भवू शकते. आनंदी राहण्यासाठी, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि विकृती आणि मृत्यु दर कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. कोमॉर्बिड व्यक्तीमधील रोग प्रतिकारक क्षमता आधीच कमी असते. कॉमॉर्बिड रूग्णांनी नियमित आरोग्य तपासणी करणे, मानसिक तणावापासून दूर राहणे आणि आपल्या ह्रदयाची काळजी घेणे आवश्यक आहे असे अपोलो क्लिनिक पुणे येथील जनरल फिजिशियन डॉ. मुकेश बुधवानी यांनी सांगितले.

कोमॉर्बिड व्यक्ती डॉक्टरांनी शिफारस केलेल्या रक्त चाचण्या करून घेण्याचा पर्याय निवडू शकतात. रक्तातील साखरेची तपासणी, वजन, यूरिक एसिडची पातळी, हिमोग्राम, मूत्रपिंड, लिव्हर फंक्शन टेस्ट, लिपिड प्रोफाइल, फॅटी लिव्हरसाठी सोनोग्राफी, लठ्ठपणा बाबत तपासणी आणि आपल्या रक्तदाबाच्या पातळीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मानसिक आजारांचा सामना करणा-या व्यक्तींनी समुपदेशकांचा आधार घ्यावा. नियमित आरोग्य तपासणीशिवाय कोमर्बिडीटी असणार्‍या व्यक्तींनी संतूलित आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. आहारामध्ये सर्व आवश्यक पोषक घटकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. ताजी फळे, भाज्या, शेंगा, डाळी, संपूर्ण धान्य आणि सोयाबीनचा आहारात समावेश करा. धूम्रपान, मद्यपान, प्रक्रिया केलेले, तेलकट, मसालेदार आणि जंक फूडचे सेवन टाळा. नियमित व्यायाम करा, तणाव कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा, रात्रीची झोपे टाळू नका. आपली औषधं घेणे टाळू नका अशी प्रतिक्रिया अपोलो डायग्नोस्टिक्सच्या टेक्नीकल ऑपरेशन्स डॉ. प्रेरणा अग्रवाल यांनी स्पष्ट केले. नियमितपणे आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि संसर्गाच्या काळात जर तुमची प्रकृती बिघडली तर त्वरित उपचार घेण्यास विलंब करू नका.