‘पाक’ आणि ‘चीन’ व्याप्‍त ‘काश्मीर’ भारताचाच भाग ; गृहमंत्री अमित शाहांची लोकसभेत ‘गर्जना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करत भारतातील ऐतिहासिक निर्णय घेतला. काल दि. ६ ऑगस्टला राज्यसभेत हे या संबधित विधेयक प्रारित करण्यात आले. त्यानंतर आज लोकसभेत या संबधित चर्चा सुर आहे. त्यात कलम ३७० रद्द करण्याविषयी अनेकांनी विरोध केला. तसंच लोकसभेत यावरून गोंधळ घालण्यात आला.

तेव्हा गृहमंत्री अमित शहा यांनी आक्रमक भुमिका घेत वेळप्रसंगी काश्मिरसाठी बलिदान देऊ, असं उत्तर विरोधकांना दिले. तसंच त्यांनी यावेळी अनेक महत्त्वाचे मुद्देही मांडले. अमित शहा यांनी पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन अर्थात पाकव्याप्त काश्मिरही भारताचाच असल्याचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

श्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरसाठीही संसदच सर्वोच्च आहे. काश्मीरबाबत नवे कायदे आणि संविधानात बदल करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. ज्यावेळी मी जम्मू काश्मीर असा उल्लेख करतो, त्यावेळी त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन अर्थात चीनव्याप्त काश्मीरचाही समावेश होतो. हे दोन्हीही भाग भारताचाच भाग आहे, असं अमित शाहांनी लोकसभेत ठणकावून सांगितले आहे.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्याबाबत संयुक्त राष्ट्राने ढवळाढवळ करावी असं तुम्हाला का वाटतं, असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला. काश्मीरबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार संसदेला आहे, असं शाहांनी नमूद केलं, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, कलम ३७० रद्द केल्याने जम्मू-काश्मिरचा विशेष राज्याचा दर्जा राहत नाही. तसंच जम्मू, काश्मिर आणि लडाख यांचे विभाजन करत त्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणू घोषित करण्यात आले आहे. त्यासोबतच अनेक मोठे बदल होणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –