‘या’ देशात पोलिसांत भरती होण्यासाठी महिलांना द्यावी लागते ‘ही’ अपमानास्पद ‘टेस्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात महिलांना पोलीस भरतीमध्ये जसे नियम पुरुष उमेदवारांना लागू होतात तसेच नियम महिलांना देखील लागू होतात. मात्र इंडोनेशियामध्ये महिलांना पोलिसांत भरती होणे सोपी गोष्ट नाही. येथील महिलांना पोलीस भरतीसाठी अत्यंत कडक नियम असून यामध्ये उच्च शिक्षण पूर्ण असणे, अविवाहित असणे त्याचबरोबर १७ ते २२ पर्यंत वयोमान असणे या सगळ्या अटींचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यांना वर्जिनिटी टेस्ट देखील द्यावी लागते. ‘टू फिंगर’ नावाची हि चाचणी महिलांवर बलात्कार झाल्यानंतर करण्यात येते.

त्याचबरोबर हैराण करणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या महिला उमेदवारांना आपल्या सौंदर्याची देखील चाचणी द्यावी लागते. या समितीत फक्त पुरुष असून हे फक्त सुंदर महिलांनाच भरती करून घेतात.

अशी असते टू फिंगर टेस्ट

महिलांसाठी हि खूप अपमानास्पद चाचणी असून यामध्ये डॉक्टर महिलेच्या किंवा मुलीच्या योनीचा लवचिकपणा तपासून ती वर्जिन आहे किंवा नाही याचा तपास करतात. यामध्ये डॉक्टर त्या महिलेच्या योनीत दोन बोटं घालून तपासणी करतात कि महिलेवर बलात्कार झाला आहे किंवा नाही.

दरम्यान, भारतात या पद्धतीची कोणतीही चाचणी होत नसून फक्त इंडोनेशियामध्येच महिलांना अशा प्रकारची चाचणी द्यावी लागते. अनेक देशांत या चाचणीला अत्यंत क्रूर आणि अपमानास्पद मानले जात असून या चाचणीवर बंदी घालण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –