×
Homeताज्या बातम्याIndonesia Earthquake | इंडोनेशियामध्ये 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; 46 जणांचा मृत्यू,...

Indonesia Earthquake | इंडोनेशियामध्ये 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; 46 जणांचा मृत्यू, 700 जण जखमी

दिल्ली : वृत्तसंस्था – Indonesia Earthquake | दक्षिणपूर्व आशियातील देश इंडोनेशिया इथे आज सकाळी भूकंपाचे (Indonesia Earthquake) मोठे धक्के बसले आहेत. जकार्तामध्ये (Jakarta) झालेल्या या भूकंपाची तीव्रता ५.४ रिश्टर स्केल होती. जकार्ता इंडोनेशियाची राजधानी आहे. या भूकंपामुळे राजधानीत प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाल्याची माहिती मिळत आहे. तर, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ४६ जणांचा मृत्यू झाला असून ७०० जण जखमी आहेत.

जकार्तामधील जावा (Java Island) बेटावर भूकंप झाल्याचे सांगितले जात आहे. इंडोनेशियातील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचं केंद्र सियांजूर, पश्चिम जावा येथे १० किमी खोलीवर होते. यापूर्वी शुक्रवारी देखील जकार्तामध्ये भूकंप (Indonesia Earthquake) झाला होता. त्या भूकंपाची तीव्रता आताच्या भूकंपापेक्षा जास्त होती. त्या भूकंपाची तीव्रता ६.६ रिश्टर स्केल होती. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी भूकंप सांयकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी झाला होता. त्याचा केंद्रबिंदू जमीनीत २० किलोमीटर खोलवर होता.

इंडोनेशिया देश प्रशांत महासागरातील अनेक बेटांच्या समूहाने बनला आहे.
हा बेटांचा समूह भूगर्भीय हालचालींच्या पट्ट्याच्या अतिशय जवळ असल्याने तिथे सातत्याने भूकंप,
ज्वालामुखी उद्रेक आणि त्सुनामी हे सातत्याने घडत असतात. आता झालेल्या भूकंपानंतर बचावकार्य सुरु आहे
आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Web Title :-   indonesia witnessed earthquake and many people killed and injured

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News