Indonesia Football Match Stampede | फुटबॉल मॅच हरल्यानंतर मैदानात झालेल्या चेंगराचेंगरीत 127 जणांचा मृत्यू

बाली : वृत्तसंस्था – इंडोनेशियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये फुटबॉल मॅच (Football Match) सुरू असताना चेंगराचेंगरी (Indonesia Football Match Stampede) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये 127 लोकांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींना उपचारांसाठी तातडीने रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे इंडोनेशिया (Indonesia Football Match Stampede) हादरून गेले आहे.

 

 

काय घडले नेमके?
हाती आलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पूर्व जावा मलंग रिजेंसी येथील कंजुरुहान स्टेडियममध्ये (Kanjuruhan Stadium) इंडोनेशियाई बीआरआई लीगा-1 च्या फुटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता. अरेमा एफसी (Arema FC) आणि पर्सेबाया सुरबाया (Persebaya Surabaya) या दोन संघांमध्ये हा सामना रंगला होता. या सामन्यात पर्सेबाया सुरबाया या टीमने अरेमा एफसी या टीमचा पराभव केला. यानंतर अरेमा एफसी टीम पराभूत झाल्यानंतर या टीमच्या चाहत्यांनी मैदानावर तोडफोड सुरू केली. यामुळे मैदानात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

या दुर्दैवी घटनेमध्ये 127 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 2 पोलिसांचा सुद्धा समावेश आहे.
स्टेडियमच्या आतमध्ये 34 लोकांचा मृत्यू झाला. तर इतरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या दुर्दैवी घटनेबद्दल इंडोनेशिया फुटबॉल संघाने (Indonesia Football Team) एक पत्रक जारी करत झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे.
‘अरेमा टीमच्या समर्थक चाहत्याच्या कृत्यामुळे आम्ही खेद व्यक्त करतो.
या दुर्घटनेमध्ये ज्या निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांनी आम्ही माफी मागतो.
या घटनेबद्दल एक चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे असे इंडोनेशिया के फुटबॉल संघाकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title :- Indonesia Football Match Stampede | violence and stampede after indonesia football match 127 dead

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही…हे भाजपचं कारस्थान; शिवसेनेने ‘रोखठोक’ सुनावले

Deepak Kesarkar | अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर केसरकरांचे स्पष्टीकरण, म्हणाले – एकनाथ शिंदे तेव्हा निर्णय प्रक्रियेतच नव्हते मग…

Maharashtra Congress | काँग्रेस आमदाराच्या दाव्याने खळबळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका!