जगातल्या ‘या’ सर्वात मोठ्या मुस्लिम देशाला बसला ‘फटका’, जाणून घ्या

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश असलेल्या इंडोनेशियाला मोठा झटका बसला आहे. जगातील व्यापार युद्धामुळे मागील तिमाहीमध्ये इंडोनेशियाच्या आर्थिक विकास दरात घसरण झाली असून तो फक्त ५ टक्क्यांवर आला आहे. मागील दोन वर्षांतील हा सर्वात कमी दर आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार कमोडिटी बूम मध्ये होत असलेल्या घसरणीमुळे इंडोनेशियाच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे. त्याचबरोबर पुढील तिमाहीमध्ये यामध्ये सुधारणा होणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. मात्र रुपयाच्या अवमूल्यनाची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे.

२६ कोटी लोकसंख्या असलेला इंडोनेशिया भारत आणि अमेरिकेनंतर जगातील तिसरा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. देशात १९ कोटी मतदार असून भारताप्रमाणेच इंडोनेशियात देखील विविध धर्माचे, जातीचे लोक मोठ्या प्रमाणावर गुण्या गोविंदाने नांदत आहेत. जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश असलेल्या इंडोनेशियात हिंदू आणि बौद्ध नागरिक देखील मोठ्या संख्येने राहतात. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील व्यापाराचा विचार करायचा झाल्यास १२ अरब रुपयांचा व्यापार दोन्ही देशांमध्ये चालतो.

भारतासह नऊ देश अमेरिकेला देणार टक्कर
भारतासहित आशिया खंडातील नऊ देशांची जिडीपी दर पुढील १० ते १२ वर्षांत अमेरिकेच्या देखील पुढे असणार आहे. डीबीएसच्या एका रिपोर्टनुसार आशियायी देशांची जीडीपी हि २८ हजार अरब रुपयांपर्यंत जाणार आहे. जी अमेरिकेपेक्षा देखील जास्त असणार आहे. या दहा देशांमध्ये चीन , हांगकांग , भारत , इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन, सिंगापुर, दक्षिण कोरिया, ताइवान आणि थायलंड या देशांचा समावेश आहे. २०३० पर्यंत या देशांची अर्थव्यवस्था वागणे विकास करणार असल्याचे देखील या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

दरम्यान, याच दरम्यान अमेरिकेचा जीडीपी दार हा २२ हजार ३०० डॉलर इतका राहणार असून हे दहा देश लवकरच अमेरिकेला मागे सोडणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –