Indonesia Masters Badminton Championships | पी.व्ही सिंधू, किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

बाली : वृत्तसंस्था – Indonesia Masters Badminton Championships | भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू (P. V. Sindhu), किदांबी श्रीकांत (Kidambi Srikanth) आणि एच. एस. प्रणॉय (Prannoy H. S.) यांनी 2021 इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या (Indonesia Masters Badminton Championships) उपांत्यपूर्व फेरीत धडाक्यात प्रवेश केला आहे. गुरुवारी झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात सिंधूने स्पेनच्या (Spain) क्लारा अझुरमेंडीचा (Clara Azurmendi) तीन सेटमध्ये 17-21, 21-7, 21-12 असा पराभव केला; तर श्रीकांतने पुरुष एकेरीच्या सामन्यात (Indonesia Masters Badminton Championships) इंडोनेशियाच्या (Indonesia) सातव्या क्रमांकाच्या जोनाटन क्रिस्टला (Jonathan Christ) 13-21,21-18,21-15 असे पराभूत केले. तर दुसरीकडे भारताच्या एच. एस. प्रणॉयने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या व्हिक्टर एक्सेलसेनला (Victor Excelsen) 21-14, 21-19, 21-16 असे नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीत एच. एस. प्रणॉय समोर भारताच्याच किदांबी श्रीकांतचे मोठे आव्हान असणार आहे.

 

दोन वेळा ऑलिपिंक पदक विजेत्या 26 वर्षीय सिंधूने 47 मिनिटे चाललेल्या सामन्यात सुरुवातीचा गेम 17-21 अशा फरकाने गमावला. पण यानंतर त्याने दमदार पुनरागमन करत 23 वर्षीय क्लाराला 21-7 अशा मोठ्या फरकाने हरवत दुसरा सेट जिंकला.अखेरच्या तिसऱ्या गेममध्ये जागतिक क्रमवारीत 56 स्थानावर असणाऱ्या क्लाराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र सिंधूने आपला अनुभव पणाला लावत 21-12 अशा फरकाने हा सामना जिंकला. तसेच पी. व्ही. सिंधूची पुढील लढत तुर्कस्तानच्या (Turkey) नेस्लिहान यिगितशी (Nestlihan Yigit) होणार आहे. (Indonesia Masters Badminton Championships)

 

 

श्रीकांतचीही सुरुवात काहीशी खराब झाली.
पहिल्या गेममध्ये जोनाटनने 13-21 असे गुण मिळवत सामन्यात आघाडी घेतली
पण त्यानंतरच्या दोन्ही गेम्समध्ये मात्र श्रीकांतने पुनरागमन करत 21-18, 21-15 अशा फरकाने हा सामना जिंकला.
तर दुसरीकडे भारताच्या (Indonesia Masters Badminton Championships)
लक्ष्य सेनला (Lakshya Sen) जपानच्या (Japan) के. मोमोटोकडून (K. Momoto) पराभव पत्करावा लागला.
तर ध्रुव कपिला (Dhruv Kapila) व एन. सिक्की रेड्डी (N. Sikki Reddy) या मिश्र जोडीलाही पराभवाचा सामना करावा लागला.
याचबरोबर अश्‍विनी पोनप्पा (Ashwini Ponnappa) व सिक्की रेड्डी (Sikki Reddy) या जोडीला जोंग कितीथाराकुल (Jong Kititharakul) – रविंदा प्राजोंगजई (Ravinda Prajongjai) या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.

 

Web Title :- Masters Badminton Championships | PV Sindhu, Kidambi Srikanth, H. S. Pranay reaches in quarter finals Indonesia Masters

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा