वापरलेल्या ‘सॅनेटरी पॅड्स’ना उकळून पितात येथील युवक, कारण जाणून तुम्ही देखील व्हाल ‘हैराण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीरियड्समध्ये महिलांनी वापरलेल्या सॅनिटरी पॅड्सना इंडोनेशियातील तरुण उकळून घेतात आणि त्याचे पाणी पिऊन नशेचा आनंद घेतात. याने हे स्पष्ट होते की ते सॅनिटरी पॅडचा नशा करतात. हा नशा अत्यंत धोकादायक आहे. रिपोर्ट्सनुसार इंडोनेशियाचे तरुण सर्वप्रथम सॅनिटरी पॅड्सना उकळून घेतात आणि नंतर ते पाणी पितात.

रिपोर्ट्सनुसार, सॅनिटरी पॅडपासून नशा करणारे तरुण असे म्हणतात की याचा नशा केल्यानंतर त्यांना वेगळाच अनुभव येतो. त्याच वेळी, एका व्यक्तीने सांगितले की सॅनिटरी पॅडचा नशा केल्यानंतर तो एका वेगळ्याच जगात जातो आणि तो उडत असल्याचा भास त्याला होतो.

मीडिया रिपोर्टनुसार नॅशनल नारकोटिक्स एजन्सी (NCB) चे सिनिअर कमांडर सुप्रिनटों ने स्ट्रेट्स न्यूजला सांगितले होते की, हे तरुण पॅड गरम पाण्यात उकळवतात आणि थंड झाल्यावर ते पाणी पितात. सॅनिटरी पॅडमध्ये सोडियम पॉलीक्रिलेट असते, जे एक द्रव पदार्थास शोषण्यास मदत करते, त्याचे सेवन करणे तरुणांना शारीरिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात नुकसानदायक ठरू शकते.

You might also like