शार्क माशाचा चेहरा माणसासारखा, खरेदी करणार्‍यांची झाली गर्दी, मच्छिमार म्हणाला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका मच्छिमाराने समुद्रातून शार्क माशाचे असे पिल्लू पकडले आहे ज्याचा चेहरा एकदम माणसासारखा आहे. हा प्रकार इंडोनेशियाचा आहे, येथे मच्छिमाराने विचित्र दिसणार्‍या शार्क माशाचे पिल्लू पकडले आहे.

डेली मेलनुसार, 48 वर्षीय मच्छिमार अब्दुल्ला नूरन यांनी दावा केला आहे की, त्यांना पूर्व नुसा तेंगारा प्रदेशात रोटे नादोजवळ पाण्यात छोटा शार्क मासा सापडला ज्याचा चेहरा बिलकुल माणसांप्रमाणे आहे. आता या शार्क माशाचे छायाचित्र सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे.

मच्छिमाराने चुकून एक मोठा शार्क मासा पकडला होता. मात्र, या माशाच्या पोटात तीन पिल्ले होती. त्यापैकी एका छोट्या शार्क माशाचा चेहरा माणसाच्या चेहर्‍यासारखा आहे, त्याला सुद्धा ओठ आणि डोळे आहेत. छोटा शार्क मिळाल्यानंतर नूरन त्यास घरी घेऊन आला आणि त्याच्या कुटुंबाने त्यास सुरक्षित ठेवण्यास मदत केली. त्यांनी सांगितले की, शेजार्‍यांनी त्यांच्याकडून माणसासारखे दिसणारे हे शार्क माशाचे पिल्लू खरेदी करण्याची तयारी दाखवली, परंतु नूरनने नकार दिला.

नूरन यांनी म्हटले, मी सुरूवातीला एक मोठा शार्क मासा पकडला. दुसर्‍या दिवशी मी त्या शार्कच्या पोटातून तीन छोटे शार्क मासे बाहेर काढले. दोन आपल्या आईसारखे होते आणि एकाचा चेहरा मनुष्याच्या बाळाचा जन्माच्या वेळी असतो तसा होता. त्यांनी म्हटले, माझ्या हा शार्क पाहण्यासाठी येणार्‍या लोकांची गर्दी होत आहे. अनेकांना तो खरेदी सुद्धा करायचा आहे, पण मी विकणार नसून त्यास सुरक्षित ठेवणार आहे. मला वाटतं ते माझ्यासाठी लकी ठरेल.

द इंडिपेंडंटनुसार, एरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या एक समुद्र संरक्षण जैव वैज्ञानिक आणि पोस्ट डॉक्टोरल संशोधक डॉ. डेविड शिफमॅन यांनी म्हटले की, लवकर जन्म होणे किंवा एखाद्या कमतरतेमुळे शिशु शार्कची वैशिष्ट्ये विकृत होऊ शकतात.