इंडोनेशिया : मशिदीमध्ये महिला घेऊन गेली होती ‘कुत्रा’, ईश्वर अवमानाच्या आरोपातून झाली मुक्तता

इंडोनेशिया : वृत्तसंस्था – इंडोनेशियाच्या एका मशिदीत कुत्रा घेऊन गेल्याने ईश्वराचा अवमान झाल्याच्या आरोपाला तोंड देणार्‍या महिलेला सल्ला देण्यात आला आहे की, तिने एखाद्या मानोसोपचारतज्ज्ञाकडून उपचार करून घ्यावेत. तीन न्यायाधीशांच्या एका पॅनलने महिेलेला तिच्या मानसिक स्थितीमुळे आरोपातून मुक्त केले. पश्चिम जावा प्रांतातील बिनॉन्ग जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या प्रकरणी सुनावणी केली.

निर्णय देताना न्यायाधीश इंद्रा मेनाथा वीडी म्हणाले की, मानसिक समस्येमुळे ती आपली जबाबदारी घेऊ शकत नाही. यामुळे तिला दोषी ठरवता येणार नाही. तिने जे केले ते तिच्या मानसिक आजारामुळे केले आहे. याप्रकरणात अनेक मुस्लिमांचे म्हणणे होते का कुत्रा अपवित्र होता. मागच्या वर्षी जुलैमध्ये मुस्लिम बहुल इंडोनेशियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये एक महिला एका कुत्र्याला मशिदीत घेऊन जाताना दिसत होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी महिलेला खुप विरोध केला. तसचे महिलेविरूद्ध ईश्वराची अवमान केल्याप्रकरणी खटला दाखल केला होता.