महिलेने केला हैराण करणारा दावा, म्हणाली – ‘जोरात हवेची झुळुक आल्याने झाले प्रेग्नंट’ ! पोलीस करत आहेत तपास

नवी दिल्ली : जर तुम्हाला कुणी विचारले की, जोरात आलेल्या हवेमुळे कुणी महिला गरोदर होऊ शकते का? तर तुम्ही नाही म्हणाल. परंतु, हैराण करणारी बाब म्हणजे इंडोनेशियामध्ये एका महिलेने दावा केला आहे की, ती वार्‍याची एक झुळूक आल्याने गरोदर राहिली.

टाइम्स नाऊनुसार, प्रेग्नंसीच्या या प्रकरणात आता इंडोनेशियन पोलीस तपास करत आहेत की, महिला अखेर अशाप्रकारचा दावा कोणत्या आधारावर करत आहे आणि यामागील सत्य काय आहे?

प्रकरण यासाठी सुद्धा गंभीर आहे, कारण 25 वर्षांची सती जैनाह नावाच्या महिलेने हा दावा सुद्धा केला आहे की, गरोदर झाल्यानंतर एक तासानंतर तिने मुलाला जन्म दिला आहे.

महिलेला जेव्हा जाणवले ती प्रेग्नंट झाली आहे, त्यानंतर बरोबर एक तासाने तिने मुलाला जन्म सुद्धा दिला. वृत्तानुसार, तिने मागील आठवड्यात दक्षिण इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतातील सियानजुर शहरात एक निरोगी मुलीला जन्म दिला आहे.

खोलीत असताना घरात आली एक हवेची झुळूक
या घटनेचा उल्लेख करत महिलेने पोलिसांना सांगितले की, ती घरातील एका खोलीत होती जेव्हा हवेची एक झुळुक आली. यानंतर केवळ 15 मिनिटांनंतर तिने म्हटले की, पोटात वेदना होऊ लागल्या, नंतर ती वाढत गेली.

असे वाटले हवेची झुळुक माझ्या योनीत प्रवेश करतेय
महिलेने दावा केला की, कुटुंबातील लोकांना याबाबत सांगितल्यानंतर तिला सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे तिने आपल्या बाळाला जन्म दिला. महिलेने म्हटले की, दुपारच्या प्रार्थनेनंतर मी झोपली होते आणि तेव्हा मला अचानक वाटले की, हवेची झुळुक माझ्या योनीत प्रवेश करत आहे. यानंतर सर्वकाही एका तासात झाले.

वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍याने म्हटले…
महिलेच्या या विचित्र गरोदरपणाची बातमी शहरात वेगाने सोशल मीडियावर वायरल झाली. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी महिलेच्या घरी पोहचले. आरोग्य अधिकार्‍याने म्हटले की, आई आणि बाळ सुखरूप असून मुलाच्या जन्माची प्रक्रिया सामान्य आहे. महिलेने मुलीला जन्म दिला आहे आणि तिचे वजन 2.9 किलोग्रॅम आहे.

या प्रकरणी तपास सुरू
याप्रकरणी आरोग्य अधिकार्‍याने सांगितले की, अनेक महिलांच्या बाबतीत असे होते की, त्यांना गरोदरपणा तोपर्यंत जाणवू शकत नाहीत, जोपर्यंत तिला लेबर पेन (बाळांत कळा) होत नाही. या महिलेस सुद्धा असेच झाले असेल. परंतु, तपासानंतरच काही ठोस सांगता येऊ शकते. प्रेग्नंसीच्या या प्रकरणात बाळाच्या जन्मानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे.