पगार १८ हजार अन् माया जमवली २० कोटींची !

इंदूर: वृत्तसंस्था

इंदूर महानगरपालिकेत काम करणाऱ्या सर्वसाधारण कर्मचाऱ्याने तब्बल २० कोटीची माया जमवल्याचे प्रकरण समोर आले आहे. इंदूरमध्ये या कर्मचाऱ्याचे 5 आलीशान घर , 2 किलो सोने , 15 लाख रोकड, गाड्या अशी अंदाजे वीस कोटींच्या संपत्तीची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांकडून जप्तीची प्रक्रिया सुरु असून अवैधपणे पैसे गोळा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

असलम खान (अशोका कॉलनी, इंदूर ) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. असलम हा महानगरपालिकेत 18 हजार रुपये पगार असलेला एक सर्वसाधारण कर्मचारी आहे. तो राहत असलेल्या अशोका कॉलनीतील घरासह पाच ठिकाणी असलेल्या घरात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. यासह देवास, महू भागातील त्याच्या जमिनी, दोन दुकाने, घरांचे दस्तएवज, लाखो रूपये किमतीचे दागिने आणि बँक खात्यांची माहिती पोलिसांना मिळाली असून पुढील कारवाई सुरु आहे.
[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’950742fb-9a42-11e8-8b89-39b8474f8d21′]
एक फ्लॅट, तीन एसी असलेले चारचाकी वाहने , यांत एक सेडान कार आहे आणि एक क्लासिक जीप आहे. तीन महागड्या दुचाक्या, असे मोठे घबाड त्याच्याकडे आढळून आले आहे.  मनपात सर्वसाधारण कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या असलमकडे एवढी गडगंज मालमत्ता आली कशी असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
[amazon_link asins=’B01D2IBM5S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4c370f4-9a41-11e8-96a3-45177e4428b1′]
नोकरीच्या काळात तो अनेकदा सस्पेंड झाला होता. परंतु काही दिवसांनंतर त्याला परत रूजू करून घेतले जात असे. माजी आयुक्त सी.बी. सिंह यांनी तीनदा तर तत्कालीन कमिश्नर मनीष सिंह यांनी एकदा सस्पेंड केले होते. त्यानंतर त्याला बिलावली झोन मध्ये रूजू करून घेण्यात आले. अनेक बिल्डर्स आणि ठेकेदारांशी त्याचे संबंध होते, आणि तो बांधकामाचे नकाशे पास करायचा अशी माहिती तपासात समोर आली आहे.