Video : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गी यांच्या आमदार मुलाकडून पालिकेच्या अधिकार्‍यास ‘बॅट’ने ‘बेदम’ मारहाण

इंदूर : वृत्तसंस्था – पालिकेच्या वतीने जीर्ण झालेली घरे पाडण्यासाठी आलेल्या पालिका अधिकाऱ्याला भाजपा आमदार आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गी यांचा मुलगा आमदार आकश विजयवर्गी याने गुंडागिरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आमदार आकाश विजयवर्गी पालिका अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण करत आहेत.

इंदूरमध्ये पावसाची शक्यात वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेने शहरातील जीर्ण झालेली घरे तोडण्याच मोहिम हाती घेतली आहे. पालिकेचे अधिकारी एका जीर्ण घराचे तडकाम करण्यासाठी आले होते. त्यावेळी भाजपा आमदार आकश विजयवर्गी तेथे पोहचले. त्यांच्यात आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, त्यांनी क्रिकेटच्या बॅटने पालिका अधिकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आमदार अधिकाऱ्यांना मारत असताना त्यांचे कर्यकर्त्यांनी देखली अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. या प्रकरामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण बनले होते.

भाजपाचे आमदार आकाश विजयवर्गी हे या आधीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते. राहुल गांधी पहले तो पप्पू थे, लेकीन अब गधों के सतरताज बन गए असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. त्यानंतर आता पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्यामुळे भाजपाने गुंडागर्दीचा कळस गाठला असल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

सावधान ! नखांचा बदललेला रंग देतो कॅन्सरची सूचना

‘या’ घरगुती टिप्स वापरा आणि चेहऱ्याचा तेलकटपणा आणि पिंपल्स घालवा

वजन घटवायचंय… मग शांत झोप घ्या !

Loading...
You might also like