…म्हणून आलिशान बंगल्याचा करोडपती मालक मंदिराबाहेर मागत होता भीक

इंदूर : पोलीसनामा ऑनलाइन –  गेल्या काही दिवसांपूर्वी ग्वालियरमध्ये एक माजी पोलिस अधिकारी फूटपाथवर भीक मागताना दिसला होता. त्यानंतर आता इंदूरमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. इंदूरच्या रस्त्यावर एक असा भिकारी आढळला. मात्र, तो खरा भिकार नाही तर तो आहे करोडपती. त्याचा स्वत: आलिशान बंगला आणि फ्लॉटही आहे. सध्या तो एका मंदिराच्या बाहेर भीक मागत आहे.

इंदूरमध्ये सुरु असलेल्या भिकारी मुक्त अभियानाच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. या समितीतील सदस्यांनी त्या भिकाऱ्याचे ठिकाण आणि कुटुंब शोधले. वास्तविक पाहता हा खरा भिकारी नसून, तो एक श्रीमंत व्यक्ती आहे. तो एका आलिशान बंगल्याचा करोडपती मालक आहे. कालका माता मंदिराजवळ रमेश नावाचा एक वृद्ध भिक्षेकरी आहे. जेव्हा या समितीच्या सदस्यांनी त्यांची चौकशी केली तर ते स्वत: करोडपती असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे स्वत: बंगला आणि प्लॉट आहे. याशिवाय अनेक भौतिक सुख-सुविधाही आहेत.

दरम्यान, रमेश यांना दारूचे व्यसन लागले होते. हे व्यसन सोडावे यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सुधारले नाहीत. त्यानंतर कुटुंबाने त्यांना बेदखल केले. तेव्हापासूनच रमेश हे रस्त्यांवरून भटकत आहेत आणि भीक मागत आहेत.

‘भिकारीमुक्त शहर अभियाना’तून समजलं

इंदूर शहर ‘भिकारीमुक्त शहर’ म्हणून मोहिम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत निराश्रित वृद्ध आणि भिक्षेकरूंचे पुनर्वसनासाठी केंद्र उघडण्यात आले आहे. त्यानुसार, भिकारी मुक्त शहर बनवण्यासाठी एका शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये शहरातील विविध भागातील भिक्षेकऱ्यांचे रेस्क्यू करून त्यांना केंद्रात शिफ्ट करण्यात आले. तिथे त्यांच्यासाठी चहा, नाष्टा आणि दोन वेळच्या जेवणाची सोयही केली जात आहे.